जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील आदित्य मंगल कार्यालय (बीड रोड) येथे सोमवार दि. २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दुपारी १२.३० वाजता जातीचे दाखले वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांनी केले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सोमवारी २६ जून रोजी श्री गोरोबा चित्र मंदिर येथून ते आदित्य मंगल कार्यालय, येथे भव्य रॅली काढण्यात येणार आहे. रॅली नंतर आदित्य मंगल कार्यालय (बीड रोड) येथे तसेच जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात येणार आहे . जामखेड तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त वंचित व दुर्लक्षित घटकातील गोरगरिबांना पाचशे पालकांचे व विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले वाटप करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमासाठी माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे, वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण, साहित्यीक नामदेव भोसले, दक्षिण, अहमदनगर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे,माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, डॉ.शोभाताई आरोळे, आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, राज्याध्यक्ष भिमसेना सावकार भोसले, विनायक राऊत,ओमशांती, जामखेड येथील भारती दिदी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी लक्ष्मी पवार म्हणाल्या की, शासकीय कार्यालयात जातीचा दाखला मिळवण्यासाठी खूप अडचणी येतात व किचकट प्रक्रिया पूर्ण होत नाही , हीच लोकांचे अडचण ओळखूनजनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने जामखेड शहरातील व तालुक्यातील पाचशे विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी पवार ( अध्यक्षा – जनविकास सेवाभावी संस्था,जामखेड) , संतोष पिंपळे ( संचालक), सामाजिक कार्यकर्ते राम पवार यांनी केले आहे.