शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजिनामा घ्यावा- तालुकाध्यक्ष नय्युमभाई सुभेदार
जामखेड येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा रास्तारोको; विविध पक्षसंघटनांनीही दिला पाठिंबा
जामखेड प्रतिनिधी,
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात “आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल.” परंतु सरकार स्थापन होऊन बराच काळ झाला असतानाही अद्यापही राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी बाबत ठोस निर्णय झालेला नाही. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्र विधानसभेचे चालू अधिवेशन असताना जनतेच्या प्रश्नांवर, विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या मोबाईलवर ऑनलाइन जुगाराचा खेळ खेळतात अशा वर्तनामुळे केवळ शेतकऱ्यांचा अपमान झाला नाही, तर संपूर्ण लोकशाही प्रक्रियेलाही धक्का पोहोचला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा द्यावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या रास्तारोको अंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या अश्वासनांनुसार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार पक्षाच्या वतीने आज दि. २४ जुलै रोजी संपुर्ण महाराष्ट्रात चक्काजाम अंदोलन करण्यात आले. त्यानुसार जामखेड येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खर्डा चौक येथे पक्षाचे तालुकाअध्यक्ष नय्युम सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम अंदोलन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्ष नेतृत्वाखाली केलेल्या या रास्तारोको अंदोलनास जामखेड तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना,
आमआदमी पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (S.P), वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष
शिवसेना उ.बा.ठा. या पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपला पाठिंबा दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. डॉ. अरुण जाधव
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे,
आमआदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष प्रा. कुंडल राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेस (S.P) चे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ, शिवसेना उ.बा.ठा. तालुकाध्यक्ष ॲड. मयुर डोके, प्रमोद खोटे आदि पदाधिकाऱ्यांसह मंगेश आजबे, डाॅ. प्रकाश कारंडे, वसिम सय्यद, गणेश हागवणे, रामहरी जायभाय, उमर कुरेशी, चित्रांगण वारे, भुजंग जायभाय सुनिल केकान, हनुमान उगले, गणेश उगले, युवराज उगले, नितीन ससाणे, विजय काशिद, चत्रभुज वारे, बंडू उगले, सागर कोल्हे, जनार्धन भोंडवे आदि मान्यवरांसह शेतकरी व विविध पक्षसंघटनांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
रास्तारोको अंदोलनाच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.