जामखेड तालुका कलाध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 

जामखेड तालुका कलाध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

कला शिक्षकात नवनिर्मिती हा गुण असतो – शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे

जामखेड प्रतिनिधी,

कला शिक्षकांमध्ये नेहमीच नवनिर्मिती असते. कला शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना कला शिकवत नाहीत, तर त्यांच्यामध्ये सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता देखील वाढवतात. शाळेत कला शिक्षक महत्त्वाचा घटक असतो असे मत शिक्षक संघटनेचे नेते शिवाजीराव ढाळे यांनी व्यक्त केले.

जामखेड तालुक्यातील कला शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी होते यावेळी प्राचार्य बी. के मडके, बी. ए. पारखे, वकील बार संघटनेचे अध्यक्ष अँड प्रमोद राऊत, माजी मुख्याध्यापक दिलीप ढवळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पी. टी. गायकवाड, सुदाम वराट, भरत लहाने, विशाल पोले, अनिल देडे, मुकुंद राऊत, अशोक बोराटे, दिपक तुपेरे, रविंद्र कोरे, संतोष सरसमकर, संजय वस्तारे, सुरज डाडर, विकास जाधव, त्रिंबक लोळगे, भांडराव सर, शिक्षक सेल अध्यक्ष बाळासाहेब येवले, सचिव शिंदे बी एस, भास्कर साळुंके ,मनोज सभादिंडे, संपत सुळे, सत्यवान गर्जे, सुनील घाडगे, सतिश टेकाळे, अनिल शिंदे,रामनाथ ढाकणे, नासिर पठाण, निलेश वणारसे,अविनाश बोधले, संजय वरभोग, अजय अवसरे, प्रफुल सोंळकी, किरण रेडे यांच्या सह अनेक मान्यवर शिक्षक उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवाजीराव ढाळे म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात संघटन महत्त्वाचे आहे. संघटनेत खुप मोठी ताकद असते. अनेक प्रश्न संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावता येतात.

 

यावेळी अध्यक्ष मयूर भोसले, उपाध्यक्ष त्रिंबक लोळगे व संतोष म्हस्के, सचिव विकास जाधव व सूरज डाडर, खजिनदार संजयकुमार वस्तारे,महिला प्रतिनिधी संगीता दराडे, मार्गदर्शक दीपक तुपेरे व रविंद्र कोरे, जिल्हा प्रतिनिधी अशोक बोराटे या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना प्राचार्य बी. के. मडके म्हणाले की, संघटना महत्त्वाची आहे. यामुळे अनेक अडीअडचणी सोडविता येतात. शाळेत कला शिक्षक महत्त्वाचा घटक आहे.

 

प्राचार्य बी. ए. पारखे म्हणाले की, कला हे जीवन आहे. ब्रीद मध्ये खरे सामर्थ्य आहे.

अँड प्रमोद राऊत म्हणाले की संघटनेस कोणती कायदेशीर अडचण असल्यास आम्ही सहकार्य करू.यावेळी मुकुंद राऊत, संतोष सरसमकर, पी. टी. गायकवाड, यांनी मनोगते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या . तसेच

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले की, मी सदैव कला शिक्षक संघटनेच्या मागे उभा आहे आपण वेगवेगळे प्रदर्शन भरवावेत मी सदैव आपल्या पाठिशी आहे.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर भोसले यांनी केले व सांगितले की या वर्षी पासून जामखेड तालुका कलाभुषण पुरस्कार देण्यात येणार आहे. शेवटी आभार अशोक बोराटे यांनी मानले.

अहिल्यानगर जिल्हा कलाशिक्षक संघटना संस्थापक अध्यक्ष संजय पठाडे व जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी नूतन कार्यकारणीचे अभिनंदन केले.

चौकट

कला शिक्षक मयूर भोसले हे रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालय मध्ये कार्यरत आहेत त्यांनी जामखेड तालुक्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करून जागतिक पातळी चमकवले असून त्यांच्या कडे अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली ही अभिमानाची बाब आहे. असे अनेक वक्तांनी सांगितले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page