हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत एनसीसीने केलं वृक्षारोपण
हरीत जामखेडसाठी राष्ट्रीय छात्र सेना सज्ज
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड नगर परिषद व सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहिल्यानगर संयुक्त विद्यमाने हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र व एनसीसी उपक्रम अंतर्गत भव्य वृक्षारोपण जामखेड येथील तपनेश्वर अमरधाम नदी परिसरात करण्यात आले.
यावेळी जामखेड महाविद्यालय, ल ना होशिंग विद्यालय व रयतचे श्री नागेश विद्यालय जामखेड एनसीसी युनिटने शहरांमध्ये वृक्षारोपण जनजागृती रॅली काढली. झाडे लावा झाडे जगवा ,एक पेड माँ के नाम , हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या घोषणाने जामखेड चा परिसर दुमदुमून निघाला. अमरधाम नदी परिसरात रॅलीचा समारोप करून वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने देशी प्रकार वड ,पिंपळ, चिंच ,करंजी ,नारळ अश्या विविध ८० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती जामखेड नगर परिषद मुख्य अधिकारी
यावेळी साकतचे वन विभागातील सेवानिवृत्त रामभाऊ मुरूमकर यांनी ८० झाडे वृक्षारोपणासाठी देऊन संगोपनाची जबाबदारी घेतल्यामुळे एनसीसी व नगरपरिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आले.
यावेळी मनोगतात मुख्याधिकारी अजय साळवे यांनी शासनाचा हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत वृक्षारोपण करण्यासाठी जामखेड मध्ये एनसीसी विशेष सहकार्य लाभले.
पुढील वर्षी या ठिकाणी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत एक नवीन गार्डन करून वृक्षारोपण करणार आहोत .या ठिकाणी आलेल्या लोकांना वृक्षांचा फायदा व्हावा अल्लादायक वातावरण निर्माण व्हावे यासाठी वृक्षरोपण कार्यक्रमास करीत आहोत. हरित जामखेड साठी सर्व तयार आहोत. व वणप्रेमी रामभाऊ मुरूमकर यांनी ८० झाडे दिल्यामुळे अमरधाम परिसर चांगला होणार आहे असे मनोगत व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले.
17 महाराष्ट्र बटालियनचे सी ओ कर्नल प्रसाद मिझार, ए ओ कर्नल निकीत नेगी यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन गौतम केळकर, सूत्रसंचालन सेकंड ऑफिसला अनिल देडे व आभार व नियोजन सेकंड ऑफिसर मयूर भोसले व तुषार केवडे यांनी केले.