माजी नगरसेवक संदीप गायकवाड विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल …!
जामखेड प्रतिनिधी –
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील नृत्यांगना दिपाली पाटील हिने साई लॉजमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं ; तिला आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्याविरुद्ध जामखेड पोलिसात दाखल झाला विशेष म्हणजे गायकवाड यांची पत्नी लता संदीप गायकवाड या नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक पाच मधून भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढलेल्या आहेत.

त्यांच्याच पतीविरुद्ध अशा प्रकारचा गुन्हा घडल्याने जामखेड शहरात खळबळ उडाली आहे तसेच भाजपा च्या नेत्यांना ‘धक्का ‘ बसला आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी; मैत्रिणींना बाजारात जाते असं सांगून बाहेर पडलेल्या दिपाली पाटील परत न आल्याने मैत्रिणींनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला . आमदार रोहित पवारांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्या नंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि दिपाली हीस आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा संदीप गायकवाड यांच्याविरुद्ध दाखल केला. ही घटना गुरुवार तारीख ०४ रोजी घडली आणि या संदर्भातील गुन्हा शुक्रवार तारीख ०५ रोजी दाखल झाला . या घटनेमुळे जामखेड मध्ये खळबळ उडाली असून निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या उमेदवारांवर गुन्हेगार प्रवृत्तीचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात भाजपाने उभे केले आहेत असा आरोप जाहीरपणे अनेक वेळा केला आणि निवडणूक संपताच दुसऱ्याच दिवशी खळबळ जनक घटना घडली आणि आरोपाच्या आरोपीच्या पिंजऱ्यात भाजपाच्या उमेदवाराचा पती माझी नगरसेवक अलगद जाऊन अडकला.यासंदर्भात अधिक माहिती अशी ; अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे एका नृत्यांगनेने साई लॉजमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं. मैत्रिणींना बाजारात जाते असं सांगून बाहेर पडलेल्या दिपाली पाटील परत न आल्याने मैत्रिणींनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला असून रोहित पवारांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली पाटील या काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होत्या. गुरुवारी सकाळी त्या मैत्रिणींना ‘मी बाजारात जाऊन येते’ असं सांगून बाहेर पडल्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या परत न आल्याने मैत्रिणींनी त्यांची शोधाशोध सुरू केली. ज्या रिक्षाने त्या साई लॉजपर्यंत गेल्या होत्या, त्या रिक्षाचालकाकडून चौकशी केली असता त्याने त्यांना लॉजमध्ये सोडल्याचं सांगितलं. सायंकाळी मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की रूम आतून बंद होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, दिपाली यांनी पंख्याला गळफास घेतल्याचं धक्कादायक दृश्य दिसलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.या प्रकरणी दिपालीची मैत्रीण हर्षदा रविंद्र कामठे हिने दिलेल्या तक्रारीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यासंदर्भात जामखेड तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात वेगळा सोशल व्यक्त केला आणि पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली.
![]()