मा.संजय कोठारी यांच्या सामाजिक कामामुळे प्रशासनास मदत होते – पो. नि. दशरथ चौधरी
निबंध व चित्र रेखाटन स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न.
तालुका व परिसरात कोठेही अपघात घडल्या नंतर सर्वात अगोदर मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी धावुन जातात, रुग्णांना तातडीने मदत होते. त्यांचे सामाजिक काम मोठे आहे, त्यांच्या सामाजिक कामामुळे प्रशासनास देखील मदत होते कारण ते खरे देवदूत आहेत माझ्या आतापर्यंतच्या काळात मला तरी आठवत नाही असे कोणी काम करत असेल असे प्रतिपादन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली, कोठारी प्रतिष्ठान जामखेड व समर्थ हॉस्पिटल जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने राजे छत्रपती शिवाजी महाराज व भगवान महावीर यांच्यावर निबंध व चित्र रेखाटन स्पर्धा जामखेड येथील ल ना होशिंग विद्यालयामध्ये घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ दि ३ मार्च रोजी कोठारी यांच्या ६३ व्या वाढदिवसा दिवशी विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुर्डूवाडी जि. सोलापूर येथील समाजसेवक डॉ. घेवरचंद धोका हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश काशीद, नगराध्यक्षा सौ प्रांजलताई अमित चिंतामणी, उद्योजक प्रशांत बोकरिया, युवा उद्योजक गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर नाशिक भावेश बाफना, ल. ना. होशिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब पारखे विद्यालयाचे पर्यवेक्षक अनिल देडे, जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात नगरसेवक , प्रा. विकी घायतडक, मनोज कुलकर्णी अमित चिंतामणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले की सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या सामाजिक कामामुळे प्रशासनास मदत होते. सर्वांच्या आधी आपघात घडला त्या ठिकाणी जाऊन रुग्णांना तातडीने रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करतात. अनेकवेळा जी अपघाताची घटना आम्हाला माहीत होत नाही ती घटना संजय कोठारी यांच्याकडुन माहीत होते.
नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी शुभेच्छा देताना सांगितले की सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे काम खुप मोठे आहे. त्यांना देवमाणूस म्हणून लोक पहातात गोरगरिबांचे आर्शिवाद त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांना दिर्घायुष्य लाभो असे म्हणुन पुढ़ील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याच बरोबर डॉ. सुरेश काशीद अमित चिंतामणी, पोपट राळेभात, मनोज कुलकर्णी, प्रा. विकी घायतडक, सचिन देशमुख, उद्योजक प्रशांत बोकरिया, युवा उद्योजक गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर नाशिक, भावेश बाफना, प्रा. मुख्याध्यापक बाळासाहेब पारखे, पर्यवेक्षक अनिल देडे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी चित्र रेखाटन स्पर्धा आणि निबंध स्पर्धेत ल.ना. होशिंग विद्यालयातील ७०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता पैकी चित्रकले स्पर्धेत पाचवी ते दहावी १९ विद्यार्थी विद्यार्थिनी यांना आणि निबंध स्पर्धा पाचवी ते नववी १५ विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवले त्यांना ट्राफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे 
या कार्यक्रमास आकुर्डी निगडी प्राधिकरण जैन सावक संघाचे पूर्व अध्यक्ष समाजसेवक सुभाष ललवाणी, अध्यक्ष विजय गांधी, कोषाध्यक्ष नेनसुख मांडोत ,विश्वस्त दिलीप फिरोदिया, सदस्य सुरेश जैन नाशिक येथील मैत्री फाऊंडेशनचे तेजस धाडवाल ,ललीत धाडीवाल, ऍड प्रसाद गीते ,अशीष संचेती , कांतीलाल कोठारी विजय कोठारी राजेंद्र कोठारी सुनील कोठारी राहुल राखेचा आनंद नहार सुमित चानोदिया ,गौरव अरोरा, मनोज कुलथे,प्रा.धनंजय भोसले, अमोल तातेड प्रफुल्ल सोळंकी, किरण रेडे ,मिठूलाल नवलाखा, राजेश गांधी, सचिन देशमुख, डॉ.भरत दारकुंडे, डॉ.रवींद्र बारस्कर, दीपक भोरे, संतोष सरसमकर, तेजस कोठारी संकेत कोठारी, प्रवीण होळकर, विनोद सुराणा , साई भोसले सर, शिवाजी (अण्णा)भोसले आदी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश बोधले यांनी केले तर सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले आभार तेजस कोठारी यांनी मांनले
![]()
