*(IPS) अधिकारी म्हणून निवड झालेले निखिल काशिबा तांबे यांचा अरणगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार*
*आयपीएस निखिल तांबे यांच्या यशामागे कुटुंबियांचे संस्कार, त्याग आणि अथक परिश्रम आणि कुटुंबाचा मोठा वाटा-सभापती राम शिंदे*
अरणगाव (ता. जामखेड)
श्री अरण्येश्वर मंदिर परिसरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) माध्यमातून भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी म्हणून निवड झालेले निखिल काशिबा तांबे यांचा अरणगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ् आयोजित करण्यात आला होत यावेळी सभापती राम शिंदे यांच्या हस्ते काशीबा तांबे आयपीएस यांचा गुणगौरव करण्यात आला.
ग्यावेळी बोलताना सभापती शिंदे मन्हाले की ग्रामीण आणि कष्टकरी कुटुंबातून शिक्षण, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा UPSC परीक्षेत यश संपादन करून भारतीय पोलीस सेवेत स्थान मिळवणे हे अत्यंत अभिमानास्पद आहे.
अरणगावच्या या सुपुत्राने आपल्या कर्तृत्वाने अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून त्यांचे यश संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून शिक्षण घेत सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीच्या बळावर निखिल तांबे यांनी दुसऱ्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत यश मिळवून IPS पद प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशामागे कुटुंबियांचे संस्कार, त्याग आणि अथक परिश्रम यांचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून शिक्षण आणि परिश्रम यांच्या बळावर उच्च पदे मिळवू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
या कार्यक्रमासाठी ह. भ. प. कोळेकर महाराज, मा. जि. प. सदस्य श्री. मधुकर आबा राळेभात, मा. सभापती, पंचायत समिती डॉ. भगवान मुरुमकर, सरकारी अभियोक्ता, बीड अॅड. बाळासाहेब कोल्हे, सभापती, कृ. उ. बा. स. जामखेड श्री. शरद कार्ले, गटनेते जामखेड श्री. तात्या पोकळे, युवानेते श्री. सागर धस, वनक्षेत्रपाल (RFO), वन विभाग कर्जत श्री. मोहन शेळके, पोलीस निरीक्षक श्री. घनश्याम तांबे, नगरसेवक श्री. विकी धायतडक, नगरसेवक अॅड. प्रविण सानप, नायब तहसीलदार श्री. महादेव कारंडे, नगरसेवक श्री. प्रविण होळकर, प्रदेश सरचिटणीस रा. काँ. श्री. शिवाजीराव कुराडे, संचालक, कृ. उ. बा. स. डॉ. सिताराम ससाणे तसेच श्री. अमित चिंतामणी, अरणगाव माजी सरपंच श्री. लहू शिंदे, श्री. भाऊसाहेब वाघमोडे (निखिलचे काका), श्री. काशिबा बलभिम तांबे (वडील), श्रीमती संगीताताई काशिबा तांबे (आई) व श्रीमती सविता भाऊसाहेब वाघमोडे (मावशी) तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून निखिल तांबे यांच्या यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला तसेच युवकांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि प्रशासन सेवेकडे प्रेरित करण्याचा संदेश दिला.
![]()
