हाजी मुख्तार सय्यद यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

हाजी मुख्तार सय्यद यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

रमजान महिन्यामुळे बंधुभाव व सामुदायिक ऐक्य निर्माण होते – अमित चिंतामणी

जामखेड –

रमजान उपवास (रोझा) केवळ धार्मिक विधी नसून, तो संयम, त्याग, आत्मशुद्धी आणि करुणेचा संदेश देणारा पवित्र काळ आहे. या काळात भूक आणि तहानेची जाणीव ठेवून गोरगरिबांबद्दल सहानुभूती निर्माण केली जाते, ज्यामुळे समाजात बंधुत्व, सामाजिक ऐक्य आणि शांतता दृढ होण्यास मोठी मदत होते असे मत अमित चिंतामणी यांनी व्यक्त केले.

हाजी मुख्तार सय्यद मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमित चिंतामणी, हाजी मुख्तार सय्यद, हाजी नादिर शेख, इम्रान कुरेशी, जाफर सय्यद, मज्जिद पठाण, जमीर सय्यद, आज्जू सुभेदार, माजी नगरसेवक,अर्शद शेख, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, दानिश पठाण, सुदाम वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले की,
जगात शांततेसाठी रमजान उपवासाचे महत्त्व आहे.
पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपाशी राहिल्याने गरिबांच्या भूकेची जाणीव होते, ज्यामुळे श्रीमंत आणि गरिबांमधील दरी कमी होऊन सामाजिक सलोखा वाढतो. रमजानमध्ये केवळ खाण्या पिण्यावरच नाही, तर रागावर आणि वाईट विचारांवरही नियंत्रण ठेवले जाते. या आत्मशिस्तीमुळे मानसिक शांतता मिळते.

यावेळी बोलताना हाजी मुख्तार सय्यद म्हणाले की,
रमजान महिना हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना असतो या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव एक महिन्याचे निरंकार उपवास करतात. आज २९ व्या उपवासाची सांगता त्यांनी आपल्या जनता टेलर्स या दुकानात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते यावेळी बोलताना ते म्हणाले की, समाजात एकोपा, सामाजिक सलोखा राहावा तसेच मित्रमंडळीत कायमस्वरूपी जिव्हाळा राहावा यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे.
यावेळी हाजी मुख्तार सय्यद यांनी सर्वाचे आभार मानले.

*चौकट*

*जनता टेलर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक : पत्रकार सुदाम वराट*

जामखेड शहरातील नांमकीत जनता टेलर नावाचे जामखेड शहरात हाजी मुख्तार सय्यद यांचे दालन आहे. त्यांचे सर्व जाती जमातीच्या लोकांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे या दालनात दिपावली, दसरा, पाडवा, रमजान, ख्रिसमस या उत्सवात सर्व धर्मीय नागरिक याच दालनातून आपले नवीन कपडे शिवून घेतात हेच खरे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार सुदाम वराट यांनी व्यक्त केली.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles