BREAKING NEWS “जामखेडमध्ये धूमस्टाईल चोरीचा प्रयत्न फसला! महिलेच्या धाडसाने चोर जेरबंद”
वाचा नेमकं काय घडलं?”
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड शहरात रात्रीच्या अंधारात घडलेल्या चोरीच्या प्रयत्नाने खळबळ उडाली. एका महिलेच्या सतर्कतेमुळे आणि शौर्यामुळे आरोपी रंगेहाथ पकडला गेला आरोपी ज्ञानेश्वर भगवान काळे राहणार आघी तालुका जामखेड जिल्हा आहिल्यानगगर याचा चोरीचा प्रयत्न फसला महिलेच्या धाडसाने आरोपी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
याबाबत फिर्यादी पोपट मारुती तेरकर वय 55 वर्षे धंदा शेती राहणार आघी ता.जामखेड जि. आहिल्यानगगर यांच्या घरी शिरलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ५०,००० रुपयांचं सोन्याचं मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न केला, पण जाग आल्यावर आरोपी नामे ज्ञानेश्वर भगवान काळे राहणार आघी याला केस पकडून धरलं. या घटनेमुळे जामखेड शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २०/०४/२०२६ रोजी रात्री ०७:३१ वाजता जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटना मध्यरात्री ०३:३० वाजेच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. पोपट मारुती तेरकर धंदा शेती, राहणार आघी, ता. जामखेड (जि. आहिल्यानगगर ) येथील पोपट मारुती तेरकर (वय ५५) यांच्या राहत्या घरी आघी येथे ही घटना घडली आहे .
फिर्यादींच्या पत्नी सुमात्राबाई (रा. आघी, ता. जामखेड) पडद्यामागे झोपल्या असताना आरोपी ज्ञानेश्वर भगवान काळे घरात शिरला आणि मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न केला. हाताचा स्पर्श झाल्याने जाग आलेल्या महिलेनं आरोपीचं डोक्याचे केस पकडून धरून ठेवलं आणि ओरडून मदत मागवली. आरोपी फरार होण्यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतला!
याबाबत जामखेड शहर पोलीस ठाण्यात (क्र.मं. २२५/२०२६) भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ६२ (चोरीचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सरोदे करीत आहेत./
, “चोरीचं कारण स्पष्ट असून, चौकशीत आणखी रहस्यं उघड होऊ शकतात. जामखेडमध्ये ‘धूमस्टाईल’ चोऱ्यांचं सत्र सुरू आहे.” शहरात भीती आणि महिलांचं शौर्य
जामखेडमध्ये सणासुदीत मंगळसूत्र चोरीचे प्रकार वाढले असून, या घटनेने महिलांमध्ये भीती पसरली. सुमात्राबाईंच्या धैर्याची प्रशंसा होतेय – “केस पकडून चोराला धरलं, हे खरं शौर्य!” असे स्थानिक म्हणतायत. पूर्वीच्या घटनांप्रमाणे (जसे धूमस्टाईल चोऱ्या) पोलिस गस्त वाढवत आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा: रात्री दारे बंद ठेवा, सीसीटीव्ही बसवा!
आरोपीची चौकशी सुरू असून, टोळीचा भाग आहे का ते तपासात येेईल .
![]()



