चोंडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत; जामखेडच्या समस्यांबाबत आकाश बाफना यांचे निवेदन

चोंडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत; जामखेडच्या समस्यांबाबत आकाश बाफना यांचे निवेदन

जामखेड प्रतिनिधी –

चोंडी (ता. जामखेड) येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या आगमनावेळी शिवसेना युवा नेते आकाशशेठ बाफना यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या भेटीदरम्यान आकाश बाफना यांनी जामखेड शहरातील विविध प्रलंबित समस्यांबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन सादर केले. शहरातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित अडचणींचा यामध्ये समावेश होता. या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन त्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी करण्यात आली.उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही या निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या प्रसंगी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या भेटीमुळे जामखेड शहरातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी उपस्थित तालुकाप्रमुख कैलास माने सर, शहर प्रमुख मोहनजी देवकाते, ज्येष्ठ नेते कैलास अण्णा जाधव, उपजिल्हाप्रमुख तात्या वाळुंजकर, जिल्हा ओबीसी अध्यक्ष शिवकुमार डोंगरे, जामखेड तालुका शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles