Home जामखेड वार्ता श्री नागेश विद्यालयाचे ‘एन.एम.एम.एस.’ परीक्षेत घवघवीत यश

श्री नागेश विद्यालयाचे ‘एन.एम.एम.एस.’ परीक्षेत घवघवीत यश

0
5

श्री नागेश विद्यालयाचे ‘एन.एम.एम.एस.’ परीक्षेत घवघवीत यश

उज्वल यशाची परंपरा कायम,श्री नागेश विद्यालय ‘एन.एम.एम.एस.’ परीक्षेत ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक,चार वर्षात मिळणार ५ लाख २८ हजार शिष्यवृत्ती

जामखेड प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षा (सन २०२५–२६) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेस विद्यालयातील एकूण ९६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

या परीक्षेत ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
चार वर्षात विद्यार्थ्यांना मिळणार ५ लाख २८ हजार शिष्यवृत्ती.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे,

श्री नागेश विद्यालयात या परीक्षेत आयुष अविनाश बोधले व संचित संतोष खैरे या दोन्ही विद्यार्थ्यांनी १४९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या यशाने जामखेड तालुक्यात विद्यालयाचे नाव पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.

या परीक्षेत विद्यालयातील ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक खालील प्रमाणे आहेत.

आयुष अविनाश बोधले व संचित संतोष खैरे (दोन्ही १४९ गुण), भोंडवे यश महादेव (१४७ गुण), वराट यशराज शहादेव (१४५ गुण) , भवर यशराज शंकर (१४४ गुण), वटाणे ओंकार सुभाष (१२९), माळी कृष्णा नानासाहेब(१२९), धुमाळ सोहम किशोर (१२८), पवार अथर्व हर्षलकुमार (१२८), सानक सार्थक संदीप (११९), भोसले समर्थ शंकर (९१) हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून त्यांना चार वर्षात मिळणार ५ लाख २८ हजार रुपये.

संचित खैरे व यश भोंडवे या विद्यार्थ्यांना गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या या यशात मार्गदर्शक शिक्षकांचा मोठा वाटा आहे. NMMS विभागाचे प्रमुख व बुद्धिमत्ता विषयाचे मार्गदर्शक देशमुख एस.एस., विज्ञान विषयाचे मडके बी.के. व पठाण ए.एन., सामाजिक शास्त्राचे लटपटे डी.व्ही. आणि गणित विषयाचे चौधरे ए.बी. गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे ,वर्गशिक्षक संतोष पवार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित दादा पवार, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्र कोठारी, हरिभाऊ बेलेकर व विनायक राऊत, मुख्याध्यापक मडके बी.के., पर्यवेक्षक जाधवर एस.व्ही.
शाळा व्यवस्थापन समिती आणि सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे. रयत शिक्षण संस्था आणि जामखेड परिसरातून यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. श्री नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Loading

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page