*नरसापूर येथील अमानुष घटनेचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तीव्र निषेध

*नरसापूर येथील अमानुष घटनेचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तीव्र निषेध*
*आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची पांडुराजे भोसले यांची मागणी*

*जामखेड, दि. ४:*

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे तीन वर्षांच्या चिमुकलीला “खाऊ देतो” असे आमिष दाखवून गोठ्यात नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला व नंतर तिची हत्या करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आला. या घटने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून समाजमन सुन्न झाले आहे.

याबत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुराजे भोसले यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात स्त्रियांच्या रक्षणासाठी कठोर कायदा केला होता. परस्त्रीचा अवमान करणाऱ्याला तात्काळ व कठोर शासन केले जात असे,” असे भोसले म्हणाले.

“त्याच आदर्शाचे अनुकरण करून शासनाने या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीस लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी आमची मागणी आहे. अशा नराधमांना कायद्याचा धाक राहिलेला नाही कारण न्यायप्रक्रियेस अनेक वर्षे लागतात. अशा प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी दोषीला फाशीची शिक्षा व्हावी,” अशी मागणी पांडुराजे भोसले यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व जामखेड येथील सर्व ग्रामस्थ, धारकरी यांच्या वतीने केली आहे.

यावेळी जगन्नाथ म्हेत्रे, बंटी पाटील, उमेश राळेभात, सचिन देशमुख, नागेश आरेकर, ओम भोसले, विवेक देशपांडे, विनायक राळेभात, आदित्य पोकळे, निखील चव्हाण, प्रमोद दाणी, विजय कुलकर्णी, निलेश मोरे, महेश बहिर, दर्शन भोसले, भाऊ पोटफोडे, सागर घुमरे, प्रविण होळकर भरत बांगर आदी धारकरी उपस्थित होते.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles