फेटे बांधून, लेझीम-झांज ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक; श्री नागेश विद्यालयाचा प्रवेशोत्सव उत्साहात.
जामखेड : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ सोमवारी (दि. १५ जून) उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. विद्यालयाचा प्रवेशोत्सव विविध उपक्रमांनी रंगला. पाचवीच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक फेटे बांधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. एनसीसी पथक व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी नवीन विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच शैक्षणिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्ष स्कूल कमिटीचे श्रेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य राजेंद्र कोठारी, विनायक राऊत, नगरसेवक राजेंद्र गोरे, प्राचार्य मडके बि के,पर्यवेक्षक जाधवर एस व्ही,अमोल बहिर, अशोक यादव, मुक्तार सय्यद, जितेंद्र बोरा, विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्य बी. के. मडके यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना विद्यालय स्पर्धा परीक्षा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये अग्रस्थानी राहील, असा विश्वास व्यक्त केला.
स्कूल कमिटी सदस्य विनायक राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयाच्या पाठीशी कायम उभे राहण्याची ग्वाही दिली.
अध्यक्षीय समारोपात हरिभाऊ बेलेकर यांनी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, विविध उपक्रमांतील यश आणि शिक्षकांची तळमळ यांचे कौतुक करत नवीन विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत केले.
प्रवेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक करून विद्यालयाचे अभिनंदन केले. विद्यार्थी मिरवणूक, लेझीम-झांज पथक तसेच एनसीसी पथकाचे नियोजन एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष ससाणे यांनी मानले.
![]()
