अमोल राळेभात यांची रयत शिक्षण संस्थेच्या ‘कन्या विद्यालय’ स्कूल कमिटी सदस्यपदी निवड

*अमोल राळेभात यांची रयत शिक्षण संस्थेच्या ‘कन्या विद्यालय’ स्कूल कमिटी सदस्यपदी निवड!*

जामखेड:प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील आशिया खंडातील सर्वात मोठी नामांकित संस्था असलेल्या ‘रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग, अहिल्यानगर अंतर्गत येणाऱ्या कन्या विद्यालय, जामखेड येथील स्कूल कमिटी सदस्य म्हणून जामखेडचे सुपुत्र अमोल जगन्नाथ राळेभात यांची निवड करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने नुकतेच त्यांना याबाबतचे अधिकृत पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक असलेले जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांची ही निवड **०१/०४/२०२६ ते ३१/०३/२०२९** या तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जामखेड तालुक्यासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने विभागीय अधिकाऱ्यांनी अमोल राळेभात यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, त्यांच्या कार्यकाळात कन्या विद्यालय, जामखेड या शाखेच्या सर्वांगीण आणि गुणात्मक विकासासाठी त्यांचे बहुमोल योगदान लाभेल, असा विश्वास पत्राद्वारे व्यक्त केला आहे.

अमोल राळेभात हे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही कार्यरत असून, आता रयत शिक्षण संस्थेसारख्या पवित्र आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या संस्थेमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाल्याने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातून आनंद व्यक्त होत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व मित्रपरिवार, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून भरभरून कौतुक व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवत स्कूल कमिटीच्या सदस्यपदी निवड केली नक्कीच त्याच्या विश्वास सार्थक ठेवील असे अमोल राळेभात यांनी सांगितले

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles