घरात लगीनघाई पण नियतीचा घाला.. लग्न 7 दिवसावर,जामखेडच्या खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरचा अपघाती मृत्यू

काळाचा घाला.. लग्न 7 दिवसावर,जामखेडच्या खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरचा अपघाती मृत्यू

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील नाहूली येथील एका तरुणासोबत अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घरात या तरुण खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरचे सात दिवसांवर लग्न आलं असतानाच त्याचा जामखेड-खर्डा रोडवर ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या आपघातात मृत्यू झाला. यादुर्दैवी घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

लग्न घरात लग्नाची धामधूम सुरु होती. पाहुणे मंडळींना पत्रिका वाटप सुरु होतं. दि 23 मे रोजी म्हणजे सात दिवसांवर लग्न आल्याने घरात लग्नाची तयारी आणि आनंदाचं वातावरण होतं. तेवढ्यात काळाने आपला घाला घातला, याबाबत अधिक माहिती अशी की मयत पशुवैद्यकीय डॉक्टर प्रल्हाद जाधव(वय २४) रा. नाहुली हा आज शुक्रवार दि. १६ रोजी सकाळी जामखेड वरून जनावरांची औषधे घेऊन आपल्या नाहुली गावी चालला होता.

या दरम्यान खर्डा रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ वीट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना आपघात होऊन पशुवैद्यकीय डॉक्टर तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला ताबडतोब उपचारासाठी जामखेड येथील खाजगी दवाखाना घेऊन गेले मात्र पुर्वीच त्याचा मृत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

डॉ जाधव हा दोन वर्षांपासून मुक्या प्राण्यांची सेवा करत होता दोन वर्षांपासून तो खाजगी पशुव्याद्यकीय डॉ म्हणून परिसरात प्रसिद्ध होता.जामखेड तालुक्यातील नाहुली येथील प्रल्हाद जाधव याने काही दिवसापूर्वी खाजगी मेडिकल मध्ये जॉब केला होता यानंतर दोन वर्षांपूर्वी व्हिटरनरी कोर्स केला व स्वतः व्यवसाय सुरु केला अत्यंत गरीब परिस्थिती त त्याने व्यवसायाला चांगला जम बसवला होता.

डॉ प्रल्हाद जाधव यांचे येत्या 23 तारखेला लग्न होते घरात लगीनघाई सुरु असताना नियतीने जाधव कुटुंबावर आघात केला डॉ जाधव यांच्या मागे आई वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे सध्या जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे

 

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles