अखेर 3 तासाच्या प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश

अखेर 3 तासाच्या प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील नवनाथ श्रीरंग पारे यांच्या विहीरीत काल मध्यरात्री च्या सुमारास बिबट्या पडला. आज सकाळी परीसरातील शेतकऱ्यांना विहीरीत बिबट्या पडला असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती वनविभागास कळविली असता


वनपरिक्षेत्र अधिकारी कर्जत/जामखेड मोहन शेळके यांचे मार्गदर्शनाखाली व सरपंच लहु शिंदे, अंकुश शिंदे व इतर ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्याने वनपाल राजेंद्र भोसले, वनपाल सुरेश भोसले, वनरक्षक प्रविण ऊबाळे, आजिनाथ भोसले, रवि राठोड वनकर्मचारी श्याम डोंगरे, शिवाजी चिलगर,राघु सुरवशे, महेश काळदाते,शरद सुर्यवंशी, हरिश्चंद्र माळशिखारे,संजय अडसूळ, सुभाष धनवे, यांनी शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला सुखरूप जेरबंद करुन विहिरी बाहेर काढले पुढील कार्यवाही वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात येईल.

 

 

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles