दुर्दैवी! पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

दुर्दैवी! पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

जामखेड प्रतिनिधी,

नगर येथून धानोरा  या ठिकाणी नातेवाईकाकडे आलेल्या आवेज रिजवान पठाण (वय १७) या मुलाचा विहिरीतील पाण्यात बुडुन मृत्यू झाला आहे. आवेज हा गुरूवारी सकाळी मित्रांसोबत विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. या वेळी ही दुर्घटना घडली. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत पठाण (रा. गांधीनगर, बोल्हेगाव  हा धानोरा या ठिकाणी मामेबहीणीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आला होता. रात्री वाढदिवस झाल्या नंतर आवेद हा चुलत भाऊ व मित्र त्या रात्री मुक्कामासाठी धानोरा या ठिकाणी नातेवाईकडे थांबले होते. दुसर्‍या दिवशी गुरूवारी आठ वाजण्याच्या सुमारास पठाण हा चुलत भाऊ अन्वर पठाण व जय आरू असे तिघेजण धानोरा येथील घराजवळील विहीरीवर पोहायला गेले होते. यावेळी आवेज याने विहीरीत उडी मारली.


मात्र, तो पाण्यातून वर आलाच नाही म्हणून त्याचा चुलत भाऊ व मित्र या दोघांनी मोठ्याने आरडाओरड केला. त्यांचा आवाज ऐकून वस्तीवरील नातेवाईकांनी विहिरीकडे  धाव घेतली. यानंतर पोलीस पाटील योगिनाथ जायभाय यांना फोनद्वारे माहीती दिली. पिंपरखेड येथील रफीक सय्यद यांनी २३ फुट खोल पाण्यात बुडी घेऊन आवेज याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. वाजिद पठाण, हरीदास शिरगिरे, बालाजी शिंदे, भाऊराव काळे, लाला शिंदे, बाबुराव वाघ, सिकंदर शेख, सलीम शेख यांनी त्यांना मदत केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पुष्कर कडु, उपनिरीक्षक सलिम शेख, जितेंद्र सरोदे, योगेश दळवी, मंडल अधिकारी विजय चव्हाण उपस्थित होते.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles