मिलिंद नगर येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रम
जामखेड प्रतिनिधी :
शहरातील मिलिंद नगर येथे शनिवार (दि. ११ एप्रिल २०२६) रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मिलिंद नगर जयंती महोत्सव जामखेड समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादनाने करण्यात आली. या रक्तदान शिबिरासाठी लाईफ लाईन ब्लड बँक तसेच युनिटी हॉस्पिटल यांच्या वतीने आरोग्य तपासणीचे विशेष सहकार्य लाभले.
या शिबिरास जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी, नगरसेविका संगीता रामचंद्र भालेराव, नंदा प्रविण होळकर, प्राचार्य तथा नगरसेवक विकी घायतडक, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, युवा नेते प्रविण होळकर,संतोष गव्हाळे, बौद्धाचार्य अशोक आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच समितीचे अध्यक्ष अंकल घायतडक, उपाध्यक्ष उबेद शेख, सचिव ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, खजिनदार सुमित भालेराव, सहसचिव विकी कांबळे, मंगेश घोडेस्वार,राम गायकवाड, अभिषेक सदाफुले, सोहेल अत्तार, अवि ओहोळ, सुशिल राजगुरू, संकेत घायतडक आदींसह सदस्य व मिलिंद नगर मित्र मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
या उपक्रमात परिसरातील तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत रक्तदान केले. तसेच अनेकांनी आरोग्य तपासणी शिबिराचाही लाभ घेतला.
![]()
