इंदिरा इन्स्टिटयूट कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

*इंदिरा इन्स्टिटयूट कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

*डि फार्मसी चा 100% निकाल रेश्मा आंधळे प्रथम तर नाझमिन शेख द्वितीय*

जामखेड प्रतिनिधी,

चेतना सेवा संस्था संचलित इंदिरा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी साकत येथील विद्यार्थ्यांनी डि फार्मसी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने डि फार्मसी च्या उन्हाळी परीक्षा मे 2025 मध्ये घेण्यात आल्या होत्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये चेतना सेवा संस्था इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी साकत डि फार्मसी प्रथम वर्षाचा 100 % निकाल लागला आहे.

यामध्ये डि फार्मसी प्रथम वर्ष प्रथम रँक रेश्मा आंधळे, द्वितीय रँक नजमीन शेख, तृतीय रँक पवार राहुल,, फोर्थ रँक दौण्ड सुबोध यांनी क्रमांक मिळवले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ पल्लवी सूर्यवंशी व सचिव डॉ सुहास सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे.

चेतना सेवा संस्था इंदिरा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी साकत हे सन 2024-2025 पासून सुरु आहे डि फार्मसी कॉलेजला परीक्षा केंद्र मंजूर झालेले असून या कॉलेज मध्ये जामखेड पाटोदा शिरूर आष्टी कर्जत परांडा बीड परिसरात विद्यार्थी प्रवेश घेतात गुणवंत्ता पूर्ण विद्यार्थी घडविणे हेच संस्थेचे ब्रीद वाक्य आहे या कॉलेजमुळे परिसरातील विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.

 

तेव्हा ग्रामीण शहरी भागातील विध्यार्थ्यानी याचा लाभ घेतला पाहिजे शहरापासून जवळच साकत येथे हि संस्था उभी राहिली आहे.

यावेळी बोलताना डॉ पल्लवी सुहास सूर्यवंशी म्हणाल्या की, B. Sc Nurshing-college Code-9440,D pharm -college Code-05656….A. D. M. L. T-College Code-2134….GNM College Code-1605 या सर्व कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरु आहे. मुलींनी कुठेतरी स्वावलंबी झालं पाहिजे हि काळाची गरज आहे, मुली आर्थिक सक्षम झाल्या म्हणजे परिवाराची जबाबदारी अर्धी पेलू शकतात कुटुंबाला याचा हातभार लागू शकतो ती स्वतः च्या पायावर उभी राहू शकते तेव्हा याचा मुलींनी मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा डॉ पल्लवी सूर्यवंशी यांनी केले आहे.

या कॉलेजची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत, सुसज्ज लायब्ररी, सुसज्ज लॅब, अनुभवी प्राध्यापक वर्ग, मुलींसाठी होस्टेल, येण्याजाण्यासाठी बस सेवा, कुठलेही प्रकारचे डोनेशन नाही, सरकारी नियमानुसार शिष्यवृत्तीचा लाभ,मुलींसाठी मोफत प्रवेशतेव्हा लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा अधिक माहितीसाठी संपर्क-9075915450, 9130760106, 8329876444, 7709778776

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles