जामखेड – साकत येथिल इंदिरा पॉलिटॅक्निक कॉलेजला राज्य शासनाची मंजुरी

जामखेड – साकत येथिल इंदिरा पॉलिटॅक्निक कॉलेजला राज्य शासनाची मंजुरी

 

जामखेड प्रतिनिधी

 

जामखेड तालुक्यातील साकत येथिल चेतना सेवा संस्था संचलित इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेजला राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे शासनाच्या निर्देशानुसार मुलींना मोफत प्रवेश आहे मात्र संस्थेला वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या पॉलिटॅक्निक कॉलेजला प्रवेश घेणार्‍या मुलांना देखील यावर्षी मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ पल्लवी सुहास सुर्यवंशी यांनी दिली.

तांत्रिक आणि व्यावसायिक क्षेत्रात एक मजबूत करिअर घडवण्यासाठी अनेक विद्यार्थी दहावी नंतर पॉलिटेक्निक कोर्सेस निवडतात. दहावीनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमामध्ये प्रवेश घेतल्याने उत्तम करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात. आणि हीच संधी तुम्हाला आता जामखेड तालुक्यात म्हणजे शहराच्या जवळ साकत या ठिकाणी असलेल्या चेतना सेवा संस्था संचलित इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मिळणार आहे. कारण या कॉलेजला नुकतीच मंजुरी मिळाली आसुन या कॉलेजमध्ये मध्ये कॉम्प्युटर इंजिनियर,(60 जागा) आर्टिफशिकल इंजिनिअर, (60 जागा), मॅकेनिकल इंजिनिअर ,(60 जागा), इलेक्ट्रिकल इंजिनिअर ,(60 जागा), इन्फॉर्मेशन टॅकनॉलॉजी ,(60 जागा), व सिव्हिल इंजिनिअर ,(60 जागा), असे कोर्सेस सुरु झाले आहेत. सदरचा कोर्स एकुण तीन वर्षांचा आहे.

मुलींना शासन नियमानुसार मोफत प्रवेश असला तरी संस्थेला वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुलांना देखील मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच सरकारी नियमानुसार शिष्यवृत्ती चा लाभ, डोनेशन नाही, वसतीगृहाची सुविधा, बसची सुविधा व तीन वर्षे कॉलेज पुर्ण झाल्यावर शंभर टक्के नोकरीची गॅरंटी देखील कॉलेजच्या वतीने देण्यात आली आहे. मुंबई, पुणे या जिल्ह्याच्या ठिकाणी या कोर्सेसला खुप मागणी आहे. विशेष म्हणजे मुलिंना कॉम्प्युटर कोर्सेस करुन त्यांना आर्थिक सक्षम बनवणे स्वतःच्या पायावर उभे करणे ही आमची जबाबदारी आहे. मुलांच्या सुरक्षेस प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच शहराजवळ कॉलेज झाल्यामुळे मुलांच्या रहाणे व जेवणाचा दरमहा चार ते पाच हजार रुपये खर्च वाचणार आहे. त्यामुळे नगर कींवा पुण्याला विद्यार्थींना जाण्याची गरज नसुन याठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थींनी आपले ऑनलाईन फॉर्म भरून लवकरात लवकर प्रवेश निश्चित करण्याची आवहान चेतना सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ. डॉ पल्लवी सुहास सुर्यवंशी यांनी केले आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles