दुसरीचा शिवराज जाधव इस्रो (ISRO) सहल विमान प्रवासाने अनुभवणार…..

*दुसरीचा शिवराज जाधव इस्रो (ISRO) सहल विमान प्रवासाने अनुभवणार…..*

*खर्डा मुले शाळेच्या विद्यार्थ्याची स्पर्धा परीक्षेतून निवड…शिवराजवर अभिनंदनाचा वर्षाव*

जामखेड प्रतिनिधी,

*जामखेड तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा खर्डा मुले या शाळेचा दुसरीचा गुणवंत विद्यार्थी शिवराज अशोक जाधव याला स्पर्धा परीक्षेतून भारतीयअंतराळ संशोधन केंद्र( ISRO ) अभ्यास दौरा विमान प्रवासासाठी निवड झाली आहे.भारतीय टॅलेंट सर्च (BTS) या स्पर्धा परीक्षेत शिवराजने 150 पैकी 134 गुण घेऊन महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

तो शांत,संयमी व अभ्यासू विद्यार्थी असून.अनेक स्पर्धा परीक्षेत शिवराजने उत्तम कामगीरी केली आहे.हिंदसेवा मंडळ स्टुडंंट टॅलेंट परीक्षेत त्याने 150 पैकी 144 गुण घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत 150 पैकी 132 गुण तर लक्ष्यवेध फाऊंडेशनच्या स्पर्धा परीक्षेत 150 पैकी 150 गुण घेऊन शिवराजने महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

*स्पर्धा परीक्षेतील त्याची तयारी उत्तम असून सातत्य,जिद्द ,चिकाटी याच्या साथीला वर्गशिक्षक तथा स्पर्धा परीक्षेतील गुणवंत शिक्षक श्री.चंद्रकांत अरण्ये सर यांचे अचूक मार्गदर्शन याच्या जोरावर शिवराजने हे उत्तुंग यश मिळविले आहे.भारत टॅलेंट सर्च परीक्षेतून महाराष्ट्रातून 1ली ते 8वी च्या प्रत्येक इयत्तेतील प्रथम तीन क्रमांक मिळवणार्‍या गुणवंतांना इस्रो येथे विमान प्रवासाची अनोखी संधी मिळणार आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात दुसरी इयत्तेतून शिवराज हा एकमेव विद्यार्थी विमानातील सफर अनुभवणार आहे.

लहान वयात शिवराजने मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल खर्डा नगरीच्या सरपंच सौ.संजीवनीताई पाटील, एस.एम.सी.अध्यक्ष मनोज मिसाळ यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी यांनी शाळा,शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles