जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

ल. ना. होशिंग विद्यालयात श्रेयशी खंडागळे प्रथम.

जामखेड प्रतिनिधी,  –

श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ल. ना. होशिंग विद्यालय तसेच जामखेड येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.

जामखेडचे दुय्यम निबंधक राहुल उगलमुगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्कार सोहळयास सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी नागेश विद्यालयाचे प्रा. मयूर भोसले,मॅथसवर्ल्ड क्लासेसचे संचालक प्रा. धनंजय भोसले, रितेश रितेश बेद्रे , विजय काशीद, महेश खंडागळे, सुधाकर सुळे, राजू राऊत, बंडू बोराटे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

 

यावेळी दुय्यम निबंधक उगलमुगले म्हणाले , जामखेड चे भूषण आणि प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी अपघातातील लोकांना वाचवण्याचे काम ते करत असतात.

दरम्यान श्रेयशी खंडागळे हिने ९५ टक्के गुण मिळवून ल. ना. होशिंग विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.

श्रेयशी खंडागळे – ९५ टक्के ल. ना. होशिंग विद्यालयात प्रथम, सानिका राऊत – ९२ टक्के ल. ना. होशिंग विद्यालय, लिशाखा गिरी – ९० टक्के, अक्षता सुळे अक्षता – ८२.२० टक्के, स्नेहा बोराटे – ८७.२० टक्के,

अर्चना जाधव – ८४.८० टक्के,

अनुष्का काशीद – ८१ टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

चौकट

टेलरच्या मुलीची गगन भरारी श्रेयसी महेश खंडागळे हि ल ना होशिंग विद्यालयात प्रथम ९५% मार्क मिळवून तालुक्यात दुसरी आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मयूर भोसले यांनी केले.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles