जामखेड बाजार समितीच्या सभापती पदासाठी भाजपचे शरद कार्ले तर उपसभापती पदी आ. रोहीत पवार गटाचे कैलास वराट यांची ..

 

सभापती व उपसभापती पदासाठी समसमान मते चिठ्ठीवर निकाल जाहीर !!

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाला समसमान जागा म्हणजे 9 – 9 जागा मिळाल्या होत्या. चिठ्ठीद्वारे आमदार प्रा. राम शिंदे गटाचे शरद कार्ले तर उपसभापती पदी आमदार रोहित पवार गटाचे कैलास वराट यांची निवड झाली आहे. तब्बल अडीच वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर जामखेड बाजार समितीची निवडणूक झाली

यात कर्जत पाठोपाठ जामखेड मधील मतदारांनी दोन्ही आमदारांच्या गटाला समसमान कौल देत संपूर्ण महाराष्ट्रात एक चमत्कार केला आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाला समसमान जागा म्हणजे 9 – 9 मिळाल्या होत्या आमदार प्रा. राम शिंदे गटातर्फे सभापती पदासाठी शरद कार्ले तर उपसभापती पदासाठी सचिन घुमरे यांनी अर्ज भरले होते

तर आमदार रोहित पवार गटाकडून सभापती पदासाठी सुधीर राळेभात तर उपसभापती पदासाठी कैलास वराट यांनी फाँर्म भरले होते. दोन्ही बाजूंना समसमान मते झाल्याने शेवटी चिठ्ठी द्वारे निवड करण्यात आली राजश्री रामभाऊ जाट या मुलीच्या हाताने चिठ्ठी उचलण्याची प्रक्रिया झाली यात सभापती पदासाठी शरद कार्ले यांच्या नावाची चिठ्ठी निघाली तर उपसभापती पदासाठी कैलास वराट यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. कोणत्याही गटाकडे स्पष्ट बहुमत नव्हते. धोका नको व कोणी फुटू नये म्हणून दोन्ही गटानी आपापले सदस्य सहलीसाठी घेऊन गेलेले होते. चिठ्ठी द्वारेच सभापती व उपसभापती निवड झाली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात
सभापती व उपसभापती निवड कार्यक्रम पुढील प्रमाणे होता

नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती दुपारी 1 ते 1.30
नामनिर्देशन पत्र छाननी 1.30 ते 1.45
वैध नामनिर्देशन यादी प्रसिद्ध करणे 2.00
नामनिर्देशन माघार 2.00 ते 2.15
अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी 2.20
आवश्यक वाटल्यास मतदान प्रक्रिया 2.25 ते 3.00
मतमोजणी 3.00 ते 3.15
निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत निकाल घोषित करणे 3.30

चिठ्ठी द्वारे सभापती पदासाठी शरद कार्ले तर उपसभापती पदासाठी कैलास वराट यांच्या नावाच्या चिठ्ठ्या निघाल्या

निवडणूक निर्णय अधिकारी आर. एफ निकम यांनी पाहिले

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles