भुसार मालाच्या खुल्या लिलाव प्रक्रियेसाठी दि. १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ असे तीन दिवस भुसार लिलाव बंद : सभापती शरद कार्ले

भुसार मालाच्या खुल्या लिलाव प्रक्रियेसाठी दि. १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ असे तीन दिवस भुसार लिलाव बंद : सभापती शरद कार्ले

जामखेड प्रतिनिधी,

भुसार मालाच्या खुल्या लिलाव नियोजन प्रक्रियेसाठी १७ ते १९ फेब्रुवारी रोजी जामखेडचे बाजार समितीचे लिलाव बंद राहणार असून सदर कालावधीत भुसार मालाचे लिलाव होणार नाहीत. अशी माहिती जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी दिली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात सभापती कार्ले यांनी म्हटले आहे की, जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी हितासाठी नेहमीच अग्रेसर असते.

त्या अनुषंगाने सभापती झाल्यापासून शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार दि. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान बाजार समितीच्या वतीने आगामी काळात भुसार मालाचे ओपन लिलाव करण्यासाठी भुसार ओपन लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे.

 

यासाठी दि. १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ असे तीन दिवस भुसार लिलाव बंद राहणार आहेत. लिलाव बंद असल्याने जामखेड बाजार समितीत शेतमाल (भुसार) घेऊन येणारे शेतकरी व खरेदीसाठी येणारे व्यापारी यांची गैरसोय होऊ नये. यासाठी प्रसिद्ध पत्रकाव्दारे हे आवाहन करण्यात येत असल्याचे सभापती पै. शरद कार्ले यांनी सांगितले.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles