आर टी आय कार्यकर्ते गणेश भानवसे यांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

आर टी आय कार्यकर्ते गणेश भानवसे यांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

जामखेड प्रतिनिधी,

आर टी आय कार्यकर्ते (माहिती अधिकारी ) गणेश भानवसे यांनी माहीती अधिकाराच्या खाली माहिती मागवून बीड येथील बेकायदेशीर सुरू आसलेले कलाकेंद्र पोलीस प्रशासना मार्फत बंद करण्यात आले. त्यामुळे संबंधित कलाकेंद्र चालकाने गणेश भानवसे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फीर्यादी गणेश अभिमान भानवसे रा. वांगी. ता. करमाळा, हल्ली रा. गणेशनगर, नगररोड, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी दि 29 फेब्रुवारी रोजी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी बीड जिल्ह्य़ातील उदंडवडगाव येथील विनापरवाना चालत असलेल्या जगदंबा कलाकेंद्रा विरोधात दि 26 जानेवारी रोजी बीड चे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी सदरचे कलाकेंद्र बंद केले आहे.

यानंतर दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास माझ्या मोबाईल नं नंबरवर भागिदारीत आसलेले कलाकेंद्र चालक गुलशन हिरामन अधारे रा. जामखेड यांनी त्यांच्या मोबाईल वरुन फोन केला व फीर्यादीस म्हणाला की, तु आमचे बीड तालुक्यातील कलाकेंद्र बंद करण्या बाबत बीड येथील पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज का दिला. आसे म्हणुन शिवीगाळ केली तसेच तु जामखेड मध्ये कसा रहातोस ते बघतो तुला जिवंत सोडणार नाही आशी जीवे मारण्याची धमकी दिली.

याच अनुषंगाने फीर्यादी गणेश अभिमान भानवसे रा. वांगी. ता. करमाळा, हल्ली रा. गणेशनगर, नगररोड, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी दि 29 फेब्रुवारी रोजी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुलशन हिरामन अंधारे रा. जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांचे विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकट

आर टी आय कार्यकर्ते गणेश भनवसे यांनी बोलताना सांगितले की मी या आगोदर देखील अनेक प्रकरणे माहिती अधिकारात उघड केलेले आहेत याच अनुषंगाने बीड तालुक्यातील बेकायदेशीर जगदंबा कला केंद्र बंद केले आहे. त्यामुळे आता मला कला केंद्राच्या संबंधित मालकांचे धमकी देणारे फोन आलेले आहेत त्यामुळे माझ्या जीवास धोका आहे, त्यामुळे प्रसासनाने यांची गांभीर्याने दखल घ्यावी.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles