भिसीच्या पैशांवरून जामखेडमध्ये लोखंडी गज व काठीने दोघांना जबर मारहाण,सात जणांवर गुन्हा, दोन आरोपी अटकेत

भिसीच्या पैशांवरून जामखेडमध्ये लोखंडी गज व काठीने दोघांना जबर मारहाण,सात जणांवर गुन्हा, दोन आरोपी अटकेत

जामखेड प्रतिनिधी,
जामखेडच्या आरोळे वस्तीत झालेल्या एका भयंकर घटनेत दोन व्यक्तींवर भीसीच्या पैशाच्या वादावरून काठी आणि लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असताना, उर्वरित आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दि.5 मे 2025 रोजी या घटनेत सहभागी असलेल्या सात आरोपींवर जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, तात्या मोतीराम लोखंडे व त्याचा चुलत भाऊ यलप्पा लोखंडे हे रात्री सव्वानऊच्या सुमारास घरी परतत असताना आरोपींनी त्यांना थांबवले. भिशीच्या पैशांबाबत चर्चा करण्यासाठी एका हॉटेलच्या शेडमध्ये बोलावले. त्यांनी तात्या मोतीराम लोखंडेला भिसीचे सव्वातीन लाख रुपये देण्यास सांगितले, जेव्हा त्यांनी पैसे नसल्याचे सांगितले, तेव्हा आरोपींनी कठोर मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तात्या मोतीराम लोखंडे व त्याचा भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.

“भिसीचे मी सर्व पैसे भरून देखील आरोपी मला पैसे मागत आहेत तसे जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे माझ्या जीवास धोका निर्माण झाला आहे. आरोपींनी तातडीने अटक करून कारवाई करावी अन्यथा मी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे तात्या मोतीराम लोखंडे यांनी सांगितले आहे.

सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हेंकॉ. प्रवीण इंगळे हे करत आहेत. या प्रकरणात पोपट दुर्गा लोखंडे, बापु ताया लोखंडे, सुरेश मुकींद लोखंडे, चंदर बापु लोखंडे, शिवाजी तात्या लोखंडे, विष्णु शंकर लोखंडे व हनुमंत महंमद लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश मुकींद लोखंडे आणि चंदर बापु लोखंडे या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles