ठरलेल्या लग्नास मुलाकडील लोकांनी दिला नकार, लग्न मोडल्याने मुलीने घेतला नको तो निर्णय

ठरलेल्या लग्नास मुलाकडील लोकांनी दिला नकार, लग्न मोडल्याने मुलीने घेतला नको तो निर्णय

मुलासह आई – वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

 

जामखेड प्रतिनिधी,

जमलेल्या लग्नास मुलाने व मुलाच्या कुटुंबीयांनीकाही महीन्यातच लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे जमलेले लग्न मोडल्याने 22 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक माहिती अशी की, मुलाकडील मुलासह आई वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीचे वडील सतिष दादासाहेब सुरवसे रा. डिसलेवाडी ता. जामखेड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून मुलाकडील मुलगा महेश दत्तात्रय मेंगडे हल्ली रा. चिखली कदळवाडी मोशी ता. चाकण जि. पुणे, (मुळ रा.कर्जत) अनुजादत्तात्रय मेंगडे व दत्तात्रय पांडुरंग मेंगडे हल्ली. रा.कर्जत ता. कर्जत जिल्हा. अहील्यानगर  अशा 3 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.

 

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दि 27 मार्च 2025रोजी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हंटले आहे की मयत माझी मुलगी मोनिका सतिष सुरवसे वय 22 वर्षे रा.डिसलेवाडी ता. जामखेड हिचा विवाह कर्जत येथीलमेंगडे कुटुंबातील मुलाशी जमला होता. मात्र लग्नजमल्यानंतर दि 18 फेब्रुवारी 2025 ते 27 मार्च 2025 रोजी पर्यंत आरोपी मुलगा महेश दत्तात्रय मेंगडे याने मुलीस वेळोवेळी म्हणत होता की तु मला आवडली नाही, मला तु मॅच होत नाही, आपली जोडी शोभून दिसत नाही असे म्हणुन मयत मोनिका हीस अपमानित केले.

तसेच मुलाची आई आरोपीअनुजा दत्तात्रय मेंगडे व मुलाचे वडील दत्तात्रयपांडुरंग मेंगडे रा. कर्जत हे फिर्यादी मुलीच्यावडीलांना म्हणत होते की तुमची मुलगी आमच्यामुलाला शोभुन दिसत नाही. त्यामुळे माझ्या मुलीचे जमलेले लग्न मोडले व या कारणावरून माझ्या मुलीने मानसिक त्रासामुळे दि 27 मार्च 2025 रोजीदुपारी 11 ते 02 वाजण्याच्या दरम्यान डिसलेवाडी येथेराहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलीआहे.

त्यामुळे मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलाकडील मुलासह आई वडिल अशातिघांवर जामखेड पोलीस स्टेशनला दि 27 रोजीम्हणजे त्याच दिवशी रात्री आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवलकर साहेब हे करीत आहेत.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles