हद्द निश्चितीच्या खुणा पुसल्यास दंडात्मक कारवाई होणार :तहसीलदार धनंजय बांगर
जामखेड–सौताडा महामार्गाची हद्द निश्चिती सुरू; रखडलेल्या कामाला मिळणार गती?
हद्द निश्चितीच्या खुणा पुसल्यास दंडात्मक कारवाई होणार :तहसीलदार धनंजय बांगर
जामखेड प्रतिनिधी
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या जामखेड–सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहरातील महामार्गाची हद्द निश्चित करण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले.
तहसीलदार धनंजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील, भूमी अभिलेख, नगरपरिषद, पोलीस व प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर संयुक्तपणे प्रत्यक्ष मोजणीस सुरुवात करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मोजणीचे काम सुरू होते.
२०२३ मध्ये भूमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्ग, नगरपरिषद, तहसील विभाग यांच्या वतीने मोजमाप करून हद्दखुणा निश्चित केल्या होत्या, पण त्या अतिक्रमण धारकाना मान्य नसल्यामुळे त्या पुसल्या होत्या राष्ट्रीय महामार्ग बाबत वाद न्यायालयात गेला होता आतापर्यंत रस्ता रखडलेला आहे. यामुळे आज पुन्हा हद्द निश्चिती कामास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, महामार्गाचे काम रखडल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खर्डा चौक ते बीड रोड कॉर्नरदरम्यान धुळीचे लोट उडत असून वाहतूक कोंडीही वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
हद्द निश्चितीसाठी सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी २४ मार्चपर्यंत हद्द निश्चितीचे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र, त्यानंतरही कार्यवाही न झाल्याने नाराजी व्यक्त होत होती.
आता प्रत्यक्ष मोजणी सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून लवकरात लवकर हद्द निश्चित करून आतिक्रमण हटवावे आणि रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
यावेळी नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, भुमी अभिलेख अनंत पाटील, प्रविण भोकणळ, राष्ट्रीय महामार्ग शाखा अभियंता दशरथ कासार यांच्या विभागाने आज मोजणीस सुरूवात केली आहे.
![]()
