*जामखेड लोकन्यायालयात तुटलेले संसार पुन्हा सांधले; पोटगीचे प्रकरण मिटवून कुमटकर दाम्पत्य पुन्हा एकत्र*

*जामखेड लोकन्यायालयात तुटलेले संसार पुन्हा सांधले; पोटगीचे प्रकरण मिटवून कुमटकर दाम्पत्य पुन्हा एकत्र*
जामखेड (प्रतिनिधी):

येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय लोकन्यायालयात’ सामोपचाराने प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर देण्यात आला. यामध्ये पोटगीसाठी प्रलंबित असलेले एक कौटुंबिक प्रकरण अत्यंत सकारात्मकरीत्या मिटवण्यात आले असून, मंदा सुरेश कुमटकर या पती सुरेश अशोक कुमटकर यांच्यासोबत पुन्हा सुखाचा संसार करण्यासाठी नांदायला गेल्या आहेत.
नेमकी घटना काय?

मंदा कुमटकर आणि सुरेश कुमटकर यांच्यात काही कारणास्तव वाद निर्माण झाल्याने हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. त्यांना ‘श्रद्धा’ नावाची ३ वर्षांची लहान मुलगी आहे. पोटगीच्या या दाव्यामुळे कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, लोकन्यायालयाच्या माध्यमातून या नात्याला पुन्हा नवी संधी देण्यात आली.
न्यायाधीश व वकिलांची यशस्वी मध्यस्थी:
हे प्रकरण मिटवण्यासाठी मा. न्यायाधीश श्रीमती यू. ए. भोसले मॅडम व मा. न्यायाधीश श्रीमती ए. बी. फंड मॅडम यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत त्यांना संसाराचे महत्त्व पटवून दिले. याकामी अर्जदाराचे वकील ॲड. जे. एम. कोल्हे आणि सामनेवाले यांचे वकील ॲड. हर्षल डोके (अध्यक्ष वकील संघ जामखेड)यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत यशस्वी मध्यस्थी केली.
या प्रक्रियेत ॲड. अमीर पठाण, ॲड. कल्पेश गायकवाड आणि साद शेख यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कोर्ट कर्मचारी श्री. येडे भाऊसाहेब व श्री. अमिना भाऊसाहेब यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले, विधी सेवा समितिचे श्री. ढगे भाऊसाहेब व पॅनल सदस्य म्हणून ॲड. अशोक थोरात,ॲड. अशोक कुंभार यांनी कामकाज पाहिले


*चिमुकलीला मिळाले आई-वडिलांचे छत्र* :
न्यायाधीश आणि वकिलांच्या या प्रयत्नांमुळे ३ वर्षांच्या श्रद्धाला पुन्हा आई-वडिलांचे एकत्रित प्रेम आणि छत्र मिळाले आहे. लोकन्यायालयामुळे केवळ खटलेच मिटत नाहीत, तर विखुरलेली कुटुंबे पुन्हा एकत्र येतात, हे या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या यशस्वी तडजोडीबद्दल न्यायालय परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles