कांदा अनुदानासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल बाजार समितीस सादर करावा : सभापती श्री शरद कार्ले

जामखेड प्रतिनिधी,

शासनाने जाहीर केलेले कांदा अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उताऱ्यावरील पिक पेऱ्याची नोंद ऑनलाईन झालेली नसेल तर तलाठी / ग्रामसेवक व कृषि सहाय्यक या त्रिसदस्यीय समितीचा पहाणी अहवाल बाजार समितीस तात्काळ सादर करावे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेडचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे.

     कांदा उत्पादक काही शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळण्यासाठी 7/12 पीकपेरा नोंदी च्या ऑनलाईन काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर दि.१ फेब्रुवारी ते ३१ मार्च  २०२३ या दोन महिन्याच्या कालावधीमधील अनुदान मिळावे यासाठी अनेक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी जामखेड बाजार समितीस अर्ज सादर केलेले आहेत

शेतकऱ्यांनी हस्त लिखित उतारे दिले आहेत त्यांनी  अधिकाऱ्यांचा संयुक्त पहाणी अहवाल तात्काळ कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेडच्या कार्यालयात सादर करावेत. जेणे करुन शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणे सुलभ होईल. असे अहवान कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेडचे सभापती पै. शरद पंडीत कार्ले यांनी केले आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles