*खर्डा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कार्यक्रमाने जिंकली कर्जत-जामखेडकरांची मने*

*‘कर्जत-जामखेड‘मध्ये उत्साहात आणि जल्लोषात पार पडला दसरा महोत्सव*

*खर्डा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कार्यक्रमाने जिंकली कर्जत-जामखेडकरांची मने*

कर्जत/ जामखेड |  कर्जत-जामखेडमधील नागरिक आणि आमदार रोहित पवार यांच्यावतीने यंदाही ‘भव्यदिव्य दसरा महोत्सव २०२३‘चे आयोजन करण्यात आले होते.  दिनांक १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान यंदाचा दसरा महोत्सव  मतदारसंघात पार पडला तसेच यंदा या दसरा उत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवात नागरिकांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रकारचे कार्यक्रम पाहता आले.  केरळ, पंजाब असे राष्ट्रीय तसेच कॅनडा आणि स्पेनमधील आंतरराष्ट्रीय कलाकारांची कला नागरिकांना या माध्यमातून अनुभवता आली हे विशेष.

नुकताच खर्डा येथील शिवपट्टन किल्ला येथे यंदाच्या दसरा महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला कार्यक्रम दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पडला. यामध्ये अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकारांनी सहभाग घेतला. यामध्ये खर्डा येथील भगव्या स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने झालेला ‘लेझर शो‘ हे प्रमुख आकर्षण ठरला.

हा लेझर शो ‘दुबई इंटरनॅशनल शो‘ तसेच ‘अयोध्या दीपोत्सव‘ सह देशातील विविध राज्यातील मोठमोठ्या कार्यक्रमात दाखवण्यात आलेला होता. तब्बल ८-१० किलोमीटरवरूनही हा शो पाहता येत होता.. त्याचबरोबर केरळ येथील प्रसिद्ध डान्स ग्रुपचा ‘शबरी चेंडे डान्स‘ देखील नागरिकांच्या पसंतीस उतरला.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्रदीपक व आकर्षक विद्युत रोषणाईने खर्डा किल्याची सजावट करण्यात आली होती. त्याचबरोबर पंजाबमधील ‘वीर खालसा ग्रुप‘ने ‘गटका‘ या पारंपारिक खेळाबरोबर अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. परदेशातील सात देशांमध्ये त्यांनी विविध प्रात्यक्षिके दाखवली असून अमेरिकेतील ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट‘ या शोचे विजेतेपदही पटकावले आहे. याचबरोबर ‘कोल्हापुरी मर्दानी खेळ‘ या संघाने शिवकालीन व युद्ध कलेची प्रात्यक्षिके सादर केली. याबरोबरच जगातील प्रसिद्ध असलेल्या कॅनडा आणि स्पेन येथील ध्वनी यंत्रणा वाजवली गेली.

त्यामुळे कर्जत जामखेडमधील नागरिकांना ४ दिवस विविध कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेता आला. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम मतदारसंघात राबवले जातात अशातच या देखील दसरा महोत्सवाच्या अनोख्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles