राष्ट्रवादी चे प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने होणार साजरा – नगरसेवक अमित जाधव

राष्ट्रवादी चे प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने होणार साजरा – नगरसेवक अमित जाधव

जामखेड प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक मधुकर (आबा) राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती नगर परिषद चे माजी नगरसेवक अमित जाधव यांनी आवाज जामखेडचा न्यूजशी दिली आहे.

यामध्ये धाकटी पंढरी (धनेगाव) येथे वृक्षारोपण तसेच महावीर भवन येथे धाकटी पंढरी (धनेगाव) या ठिकाणी दिंड्या घेऊन जाणाऱ्या महाराजांचा सन्मान, विविध क्षेत्रातील गुणवंताचा सत्कार, अनाथ, निराधार बालकांना अल्पोपहार, व पत्रकार सन्मान असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

जामखेड शहरातील महावीर भवन येथे वार रविवार दि.११ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर (आबा) राळेभात यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेवक अमित जाधव यांनी केले आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles