महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनद्वारे निवड : अँड. बंकटराव बारवकर यांना मोठी जबाबदारी

*महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनद्वारे निवड : अँड. बंकटराव बारवकर यांना मोठी जबाबदारी*

जामखेड:

महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने जामखेड येथील सुप्रसिद्ध वकील अँड. बंकटराव माधवराव बारवकर यांची जामखेड तालुका नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील नोटरी व्यवसायाशी संबंधित प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

अँड.बंकटराव बारवकर हे गेल्या 38 वर्षापासून विधी क्षेत्रात कार्यरत असून, त्यांना मोठा अनुभव आहे.त्यांनी आजपर्यंत विधी व राजकीय क्षेत्रात अनेक पदे भूषवलेली आहेत.त्यांनी पिंपळगाव आळवा या गावच्या सरपंच पदा बरोबरच, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, देखरेख संघ संचालक, जामखेड तालुका वकील संघ अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष, सदस्य संजय गांधी निराधार योजना, महाराष्ट्र काँग्रेस प्रांतिक सदस्य,भाजपा तालुका कार्यकारणीमध्ये जेष्ठ निमंत्रित सदस्य अशी अनेक पदावर कार्य केलेली आहेत.त्यांच्या नेतृत्वाखाली नोटरी असोसिएशनच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सहकाऱ्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र आणि गोवा संघटनेचे अध्यक्ष ॲड.सय्यद सिकंदर अली, उपाध्यक्ष ॲड.नितेश लालवाणी, कार्यरत अध्यक्ष ॲड.यशवंतराव खराडे, सचिव ॲड .प्रवीण नलावडे, महिला अध्यक्ष ॲड.आस्मा शेख आणि कोषाध्यक्ष ॲड .एस.जी.एच. कादरी तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles