मराठी शाळेतील विद्यार्थी अधिकारी बनू शकतो तर तुम्ही का नाही- पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी

मराठी शाळेतील विद्यार्थी अधिकारी बनू शकतो तर तुम्ही का नाही- पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी

तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून देशाच्या उभारणीमध्ये सिंहाचा वाटा उचलावा. -पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी

राजश्री शाहू महाराज जयंती व जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन नागेश विद्यालय उत्साहात संपन्न.

 

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड पोलीस स्टेशन व रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय ,ज्युनियर कॉलेज व कन्या विद्यालय जामखेड यांचे संयुक्त विद्यमाने राजश्री शाहू महाराज जयंती व जागतिक आम्ल अंमली पदार्थ विरोधी दिन नागेश विद्यालय मध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाले .

श्री नागेश विद्यालय ,ज्युनिअर कॉलेज व कन्या विद्यालय एनसीसी च्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती स्थानिक स्कूल कमिटी सदस्य विनायक राऊत ,प्राचार्य मडके मुख्याध्यापिका भोर आर आर, उपमुख्याध्यापक नाळे एस के ,पर्यवेक्षक जाधवर एस व्ही , पर्यवेक्षक संजय हजारे, शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, कुंडल रळेभात,एनसीसी ऑफिसर मयुर भोसले,

प्रा कैलास वायकर,प्रा मांडे एस आर, गुरुकु प्रमुख संतोष ससाणे , सळुंके बी एस ,श्रीम म्हके एम बी ,पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव आदी मान्यवर तसेच नागेश विद्यालय कन्या विद्यालय ,ज्यूनियर कॉलेज सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एनसीसी कॅडेट शिक्षक उपस्थित होते उपस्थित होते.

ज्येष्ठ शिक्षक दिन शिवाजीराव ढाळे यांनी

राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली.

पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी मनोगतात राजश्री शाहू महाराज हे सामाजिक आरक्षणाचे प्रणेते आहेत समाजामध्ये सुधारणा करायची असेल तर शिक्षणापेक्षा उत्तम साधन नाही. सर्वांनी महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास करावा . मी मराठी शाळेत शिकून अधिकारी झालो तर तुम्हीही नक्की अधिकारी होणार .नागेश संकुलाची भव्यता पाहून याची मला खात्री आहे. 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा करून जनजागृती केली जाते. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्य याकडे लक्ष देऊन देशाच्या उभारणीमध्ये सिंहाचा वाटा उचलावा.

असे मनोगत व्यक्त केले

शेवटी अंमली पदार्थ विरोधी दिन शपथ सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक यांना घेण्यात आली.

प्रास्ताविक प्राचार्य मडके बी के यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी इंगळे आभार प्रदर्शन संजय हजारे यांनी केले.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles