जामखेडमध्ये नवकार महामंत्र दिवस व अहिंसा रॅली उत्साहात संपन्न…

जामखेडमध्ये नवकार महामंत्र दिवस व अहिंसा रॅली उत्साहात संपन्न…

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड शहरात दिनांक ९ एप्रिल रोजी विश्व नवकार महामंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरात सामूहिक नवकार महामंत्र उच्चार करण्यात आले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात जैन समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सध्याच्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी जामखेड शहरातून अहिंसा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जैन समाजातील युवक-युवतींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात येत नागरिकांना अहिंसेचा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन श्रावक संघ जामखेड व जीतो संघटनेचे प्रफुल सोळंकी, जितेंद्र बोरा, संयोग पितळे, साहिल बेदमुथा, लक्ष्मी गादिया यांनी विशेष परिश्रम घेतले.


कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जगभरात एकाच वेळी नवकार महामंत्राचा उच्चार करण्यात आला. यासाठी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित राहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांना संबोधित केले.
याप्रसंगी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे, उपाध्यक्ष महावीर बाफना, शिवसेना युवा नेते आकाश शेठ बाफना, नगरपरिषद नगराध्यक्षा प्रांजल ताई चिंतामणी, अमित भाऊ चिंतामणी, नगरसेवक प्रवीण चोरडिया, मोहन पवार, अर्जुन म्हेत्रे, प्रवीण होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles