पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या वैभव वराटचा कोठारी प्रतिष्ठानतर्फे सत्कार

पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या वैभव वराटचा कोठारी प्रतिष्ठानतर्फे सत्कार

 

जामखेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत साकत (ता. जामखेड) येथील वैभव बळीराम वराट याची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कोठारी प्रतिष्ठानतर्फे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

वैभव वराट यांनी कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या वडिलांनी एस.आर.पी. (SRP) मध्ये सेवा बजावल्यानंतर पोलीस दलात कार्य केले होते. मात्र, वर्षापूर्वी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. वैभव यांनी पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आपल्या जिद्दीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पद गाठले.

 

त्यांचे प्राथमिक शिक्षण अमरावती येथे (१ ली ते ५ वी), माध्यमिक शिक्षण बीड येथील चंपावती शाळेत (६ वी ते १० वी) पूर्ण झाले. उच्च माध्यमिक शिक्षण अहिल्यानगर येथील रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झाले, तर त्यांनी आयटीची पदवी एमआयटी कॉलेज, पुणे येथून मिळवली. पदवीच्या शिक्षणासोबतच २०१९ पासून त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यातच अभ्यास सुरू केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२३ मध्ये ३७४ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, वैभव वराट यांनी ओबीसी प्रवर्गात ३३ वी रँक मिळवत यश संपादन केले आहे.

या विशेष यशाबद्दल कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जामखेडचे उद्योजक कांतीलाल कोठारी, साखर सम्राट अशोक चोरडिया, सुनील जगताप, धनंजय भोसले, बिभीषण वराट, विठ्ठल वराट आदी मान्यवर उपस्थित होते.

वैभवच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles