प्रजासत्ताक दिनानिमित्त जामखेड शहरातील निवासी मूकबधीर स्कुलचे युवा उद्योजक राहुल राकेचा यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त जामखेड शहरातील निवासी मूकबधीर स्कुलचे युवा उद्योजक राहुल राकेचा यांच्या हस्ते ध्वजारोहण

जामखेड प्रतिनिधी,

२६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जामखेड शहरातील निवासी मूकबधीर युवा उद्योजक राहुल राकेचा यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

श्री ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ सेलू संचलित जामखेड येथील निवासी मूकबधीर विद्यालयात युवा उद्योजक आणि कोठारी प्रतिष्ठानचे संचालक राहुल राकेश यांच्या हस्ते ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले.

यावेळी बोलताना युवा उद्योजक राहुल राखेचा म्हणाले, मी दहा वर्षापासून या शाळेत नियमित येत आहे. मुक बधीर विद्यालयातील मुलांना खूप चांगल्या प्रकारे येथील शिक्षक सांभाळत आहेत. त्यांचे राहणीमान ,स्वच्छता पाहून समाधान वाटते. साधारण आठ ते दहा शिक्षक हे विनापगार असून , विनाअनुदान शाळेत काम करत आहेत. अनुदान मिळण्याकामी जरूर प्रयत्न करू असे राखेचा यांनी सांगितले.

.
यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक गर्जे सर म्हणाले आज संजय काका कोठारी हे बाहेरगावी आहेत परंतु यांचे कार्य आम्ही गेली बारा वर्षापासून पाहत आहेत अपघातातील हजारों लोकांना वाचवण्याचे काम ते सातत्याने काम करत आहेत त्यांचा आदर्श घेऊन आम्ही सुद्धा असे कार्य चालू करत आहोत संजय काकांनी आम्हाला गेली दहा वर्षात खूप मदत केली आहे त्यांच्या मी आभारी आहोत

यावेळी आनंद नहार, संकेत कोठारी, सौ चंचल राखेचा, सौ श्वेता कोठारी, सौ सविता बेदमुथा, सौ अर्चना नहार,रोहन कोठारी, गर्जे सर , दहिफळे सर, अक्षय गोन्हे,अशोक काळे,गुफरान कुरेशी. शिंदे मॅडम. आदी उपस्थित तसेच राहुल राखेचा यांनी सर्व मुलांना खाऊ, गोळ्या बिस्कीट, नाश्ता वाटप केल्या.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles