पत्रकार फायक सय्यद कुटुंब व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई. शाखा जामखेड तालुका. च्या वतीने गरजु मुस्लिम बांधवांना रमजान ईद साठी किराणा किट वाटप करण्यात आले….

पत्रकार फायक सय्यद कुटुंब व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई. शाखा जामखेड तालुका. च्या वतीने गरजु मुस्लिम बांधवांना रमजान ईद साठी किराणा किट वाटप करण्यात आले….

जामखेड प्रतिनिधी..

मुस्लिम समाजाच्या दृष्टीने महत्वाचा व मोठा सण म्हणजे रमजान ईद हा सण आहे. महिनाभर उपवास केले जातात.. महीन्याचया शेवटी रमजान ईद साजरी केली जाते. या उपवासाची सांगता होते… असा मोठा सण असूनही समाजातील काही कुटुंबाना हा सण साजरा करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसते. आर्थिक बाजू कमकुवत असल्याने सण साजरा करण्यास अडचणी येतात.. हिअडचण लक्षात आल्यानंतर पत्रकार फायक सय्यद यांनी समाजातील काही कुटुंबाना सणानिमित्त किराणा किट भेट देण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी सय्यद कुटुंब पंधरा ते विस कुटुंबाना दोन हजार रुपयेचे किराणा किट वाटप करणत आहेत. गेली पंधरा वर्षे झाली हा उपक्रम फायक सय्यद कुटुंब राबवत आहे..

या उपक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई. शाखा जामखेड तालुका. सहभागी झाला आहे… गेली तिन वर्षापासून सय्यद कुटुंब व पत्रकार संघ सयुक्तिक पणे हा उपक्रम राबवित आहेत…. या उपक्रमाची प्रेरणा मिळाली आहे.. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई. चे प्रांम सरचिटणीस मा. विश्वासराव आरोटेसर यांच्या नेतृत्वाखाली असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.. त्यांच्या कडून मार्गदर्शन मिळत गेले.. जामखेड तालुका.. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई. हा उपक्रम राबवित आहे…

या वर्षी पंचवीस कुटुंबास किराणा किट वाटप करण्यात आले… सर्व सामान्य माणसाला हि सप्रेम भेट देताना वेगळाच अनुभव येतो.. प्रसन्न वाटते.

असि बोलकी प्रतिक्रिया दत्तात्रय राऊत पत्रकार जामखेड. व पत्रकार फायक सय्यद यांनी व्यक्त केली…

या वर्षी किराणा किट वाटप करण्याबाबत पत्रकार राऊत दत्तात्रय व पत्रकार व पत्रकार फायक सय्यद यांनी दि. २५ मार्चला चर्चा केली. या मधे २५ कुटुंबाना किट देण्याचे ठरले.. पंचविशे रुपये चे किट.. 2500/देण्यात आली…

फायक सय्यद व पत्रकार संघ जामखेड च्या वतीने हिंदू समाजातील गरजू कुटुंबाना दिवाळी सणानिमित्त असे किराणा किट भेट देत आहेत.. समाजाचे काही देणे लागतो या भावनेने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे..

फायक सय्यद कुटुंब हे रमजान व दिवाळी सणानिमित्त किट देत आहेतच. त्याही पलीकडे ते काम करत आहेत. अनेक गरजु रुग्णांना आर्थिक मदत करत असतात. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देतात.. एकुणच समाज उपयोगी उपक्रम हे कुटुंब अनेक वर्षांपासून राबवत आहे.. फायक सय्यद यांना त्यांच्या पिता श्री कडून वारसा मिळाला आहे. फायक यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते. तेही सेवेत असताना गरजु विद्यार्थ्यांना पुस्तके. वह्या. पेन. देत असत. काहीना तर शालेय गणवेश दिले आहेत… असा वारसा फायक सय्यद यांना मिळाला आहे.. त्यांची प्रेरणा व आरोटेसर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यामुळे हा उपक्रम सुरू आहे.. या पुढे ही असाच चालू ठेवनार आहोत. असे मत राऊत दत्तात्रय पत्रकार व पत्रकार फायक सय्यद यांनी व्यक्त केले…

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles