कुसडगाव येथे राहुल उद्योग समूहाच्या वतीने दोनशे लाडक्या बहिणींचा सन्मान

कुसडगावच्या लाडक्या बहिणींची गावाला अनोखी भेट काळोबा मंदिर येथे बोर घेऊन केली पिण्याच्या पाण्याची सोय

कुसडगाव येथे राहुल उद्योग समूहाच्या वतीने दोनशे लाडक्या बहिणींचा सन्मान

जामखेड तालुका प्रतिनिधी,

माहेरी आल्यावर बहीणींचे आपल्या कुटुंबावर प्रेम असतेच मात्र गावा बद्दल आदर व प्रेम वाढावे, तसेच आपले देखील गावाच्या मंदिरासाठी काहीतरी योगदान असावे यासाठी कुसडगावच्या लाडक्या बहिणींनी काळोबा मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी व मंदिर परीसरात पिण्याच्या पाण्याचा बोर घेण्यासाठी आर्थिक मदत करुन बोर घेतला. त्यामुळे राहुल उद्योग समूहाचे माजी सरपंच बापुसाहेब कार्ले व पै. हवा सरनोबत यांनी दोनशे लाडक्या बहिणींचा सन्मान केला.

 

कुसडगाव येथे सुमारे पाचशे वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाखाली श्री काळोबा महाराज यांची संजीवनी समाधी असून हे जागृत देवस्थान आहे. येथे नवस केल्यास तो पूर्ण होतो अशी अख्यातिका आहे. राहुल उद्योग समूहाचे पै दादासाहेब सरनोबत ,माजी सरपंच बापूसाहेब कार्ले यांनी स्वखर्चाने मंदिराचा जीर्णोद्धार केला असून मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मंदिराच्या परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी बोर घ्यायचा होता यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च देखील येणार होता. हीच अडचण लक्षात घेऊन दोनशे लाडक्या बहिणींनी हा बोर घेण्यासाठी आर्थिक मदत केली. विशेष म्हणजे या बोरला मोठ्या प्रमाणात पाणी देखील लागले आहे.

यावेळी राहुल उद्योग समूहाचे व माजी सरपंच बापुसाहेब कार्ले यांनी बोलताना सांगितले की काळोबा देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. याठिकाणी आम्ही मंदिराचे जवळ जवळ पन्नास टक्के काम आम्ही स्वखर्चाने पुर्ण केले आहे. तसेच दिवाळी पर्यंत मंदिराच्या बाहेरील काम देखील पुर्ण करावयाचे आहे आणि आम्ही ते पुर्ण करणार आहोत. विशेष म्हणजे मंदिरासाठी बोर घेण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी मदतीसाठी आल्या त्यांचे देखील बापुसाहेब कार्ले यांनी आभार मानले.

लाडक्या बहिणींनी स्वखर्चाने बोर घेऊन दिला असल्याने याची दखल घेऊन राहुल उद्योग समूहाच्या वतीने पहिल्यांदाच यात्रेनिमित्ताने नवीन पायंडा पडून लाडक्या बहीणींचा सन्मान केला. यावेळी गावातील महीला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच दिवशी रात्री श्री काळोबा मंदिरात आराध्याचा जागर, लघु रुद्राभिषेक यासह विविध कार्यक्रम देखील उत्साहात संपन्न झाले. या यात्रे निमित्ताने काळोबा च्या दर्शनासाठी मंदिरात जामखेड तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार पै. हवा सरनोबत यांनी मानले.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles