राजुरी गावाजवळ विटाचा ट्रॅक्टर उलटल्यामुळे एकाचा मृत्यू

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील राजुरी गावाजवळ विटाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्यामुळे शिवाजी संपत काळे (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे

जामखेड पासून ८ किलोमीटर अंतरावर राजुरी गावाजवळ उताराला ट्रॅक्टरला ब्रेक न लागल्याने ट्रॉली उलटली. शिवाजी संपत काळे (वय ६०) ट्रॅक्टर वर बसलेले होते या अपघातात ते खाली कोसळले व ट्रॉली खाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत शिवाजी संपत काळे हे जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील रहिवासी होते.
या दुर्घटनेची माहिती जामखेड येथील पोलीस साठे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन द्वारे सांगितली त्यानंतर श्री कोठारी यांनी आपले मित्र निखिल कुमकर यांना घेऊन घटनास्थळी गेले. असता मृतदेह आपल्या रुग्णवाहिकेत आणून ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे दाखल केला. यावेळी निखिल कुमकर आणि महेंद्र शिरसागर यांनी मदत केली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज शिंदे आणि किशोर बोराडे यांनी शुभविच्छेदन केले.
पुढील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजय साठे हे करत आहेत. याकामी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पालवे, पोलीस पाटील मोरे तसेच देवकाते यांनी मदत केली.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles