जामखेड ब्रेकिंग: सागर मोहळकरवर फायरिंग करणारा मुख्य आरोपी जेरबन्द ,कट्टा जप्त!साथीदार फरार
जामखेडमध्ये पैलवान सागर किसन मोहळकरवर झालेल्या फायरिंग प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुस आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पूर्ववैमनस्यातून हा गुन्हा घडल्याचे उघड झाले आहे.

दिनांक ४ मार्च २०२६ रोजी रात्री ७:३० वाजता तपनेश्वर रोड ते खाडेनगर रोडवरील नुराणी कॉलनीत मोटारसायकलवर आलेल्या अज्ञातांनी पैलवान सागर मोहळकरवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला.
सागर गंभीर जखमी झाला असून, त्याच्या वडिलांनी किसन चांगदेव मोहळकर यांच्या फिर्यादीवर जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२२/२०२६ दाखल केला. भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) व आर्म्स अॅक्ट ३/२५ अंतर्गत कारवाई सुरू झाली.
सागर हा कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो, त्याच्यावर पूर्वी दोन खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत आणि नुकताच नाशिक कारागृहातून सुटका झाली होती.घटनानंतर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पीएस वैभव कलुबर्मे व स्थानिक गुन्हे शाखेचे पी.नि. किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.पूर्ववैमनस्याची शक्यता सांगत घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.कबाडी यांच्या नेतृत्वात सपोनि हरिष भोये, पोउपनि महादेव गुट्टे व इतर १४ पोलिस अंमलदारांची दोन पथके रवाना झाली.पथकाने घटनास्थळाची पाहणी, आजूबाजूच्या व्यवसायिकांकडून माहिती गोळा केली आणि सागरच्या पूर्व वैमनस्याची चौकशी केली.

जिक्री गाव शिवारात अभिमन्यु महादेव पोते (२४, भुतवडा रोड, जामखेड) ला अटक करण्यात आली.पोते याने कबुली दिली की, चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे (शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे), रोहित विठ्ठल आखाडे (शास्त्रीनगर, कोथरुड), चिन्या (कोथरुड) हे फरार साथीदारांसोबत पूर्व वादातून सागरला मारण्यासाठी जामखेडला आले होते. ४ मार्चला त्याने सागरच्या हालचालींची माहिती दिली होती.ताब्यातील आरोपी अभिमन्यु महादेव पोते याचेकडुन गुन्ह्यामध्ये फायरिंगकरीता वापरलेला 35,000/- रुपये किमतीचा गावठी कट्टा (अग्निशस्त्र) व 01 जिवंत काडतुस, 40,000/- रुपये किमतीची गुन्ह्यामध्ये वापरलेली विना नंबरची ज्युपीटर मोटारसायकल, 15,000/- रुपये किमतीचा मोबाईल असा एकुण 90,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपी पोते याला जामखेड पोलीस स्टेशनला हजर करून तपास सुरू आहे. फरार साथीदारांच्या शोधात विशेष पथके कार्यरत असून, घार्गे व कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली सपोनि/हरिष भोये, पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, अतुल लोटके, विष्णु भागवत, गणेश लोंढे, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, योगेश कर्डीले, अमृत आढाव, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, भगवान धुळे यांची दोन पथके तयार करुन केली आहे या घटनेमुळे जामखेडमध्ये दहशत पसरली असून, गँगवॉरची शक्यता तपासली जात आहे.
![]()



