श्री गोकुळ गंधे सर यांची यवतमाळ येथे शिक्षण विस्तार अधिकारी पदी निवड ..

श्री गोकुळ गंधे सर यांची यवतमाळ येथे शिक्षण विस्तार अधिकारी पदी निवड ..

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड यांच्यावतीने सन्मान..

जामखेड प्रतिनिधी,

स्पर्धा परीक्षा करत असताना आपण सतत सकारात्मक विचार करावा. अभ्यासात सातत्य आवश्यक असते.आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. सतत कार्यमग्न राहिले पाहिजे असे श्री गोकुळ गंधे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

श्री गोकुळ गंधे मूळ नांदेड चे असून रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा हायस्कूल खर्डा येथे सहशिक्षक म्हणून काम करत आहेत.
यवतमाळ मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी  रयत बँक कर्जत शाखेचे चेअरमन दिलिप तुपे सर,श्री वसावे सर, श्री करपे सर, श्री नवनाथ आडे सर, श्री अशोक रणखांब सर, श्री अमोल भोंडवे सर, श्री योगेश दरेकर सर, श्री कदम सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंदे बी. एस.सर केले व उपस्थित सर्वांचे आभार संभाजी देशमुख सर यांनी मानले.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles