न्यायालयातही लंके यांचा विजय!.. सुजय विखेंची याचिका फेटाळली

न्यायालयातही लंके यांचा विजय!.. सुजय विखेंची याचिका फेटाळली

छत्रपती संभाजीनगर :

सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डॉ. सुजय विखे यांनी विजयी उमेदवार खासदार नीलेश लंके यांच्या विरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज (बुधवार) फेटाळून लावली.

या निर्णयामुळे निवडणुकीतील विजयाबरोबरच न्यायालयीन लढाईतही खासदार लंके यांनी बाजी मारली आहे. या निकालाकडे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर लंके समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विखे यांना मात्र मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles