77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ” INDIAN ARMY (इंडियन आर्मी) नाव साकारून देशाला मानवंदना.

77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ”
INDIAN ARMY (इंडियन आर्मी) नाव साकारून देशाला मानवंदना.

175 फूट तिरंगा विद्यार्थ्यांनी फडकवला.

जामखेड :-

रयत शिक्षण संस्थचे श्री नागेश विद्यालय जामखेड व ज्युनिअर कॉलेज व कन्या विद्यालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने
77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.

या वेळी ध्वजारोहण स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख उपस्थिती ,सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले,विनायक राऊत, कॅप्टन लक्ष्मण भोरे, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका भोर आर आर, उपमुख्याध्यापक नाळे एस के, पर्यवेक्षक जाधवर एस व्ही, पर्यवेक्षक संजय हजारे, कैलास हजारे ,रयत सेवक ,आजी-माजी सैनिक, नागेश कन्या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी एनसीसी कॅडेट, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सतरा महाराष्ट्र एनसीसी बटालियन चे नागेश विद्यालय युनिटने उत्कृष्ट संचलन सादर करून मानवंदना दिली.
देशभक्ती गीतावर इंडियन आर्मी नावांमध्ये विद्यार्थ्यांनी कवायात प्रकार सादर केले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अर्ज दाखल

प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य मानवी रचनेतील “INDIAN ARMY (इंडियन आर्मी) ” हे नाव साकारले या मानवी चित्राची लांबी 160व रुंदी 165 फूट असून क्षेत्रफळ 26400 स्क्वेअर फुट आहे .या मध्ये भव्य 175 फूट तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात धरून फडकवला आहे. कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी हे साकारले. श्री नागेश व कन्या विद्यालय मधील 2600 विद्यार्थी विद्यार्थिनी व १७ महा बटालियन एनसीसीचे नागेश विद्यालय युनिटच सहभागी झाले. यावेळी सर्व शिक्षक एनसीसी कॅडेट यांचे सहकार्य लाभले.
( Guinness World Records Application Reference: 260119135349twlc )

यावेळी
कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडियन आर्मी नाव तयार केल्याबद्दल या उपक्रमाचे कौतुक केले.
स्कूल कमिटी सदस्य सुरेश भोसले
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर यांनी मनोगत
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व
नागेश व कन्या विद्यालयातील देशभक्ती गीतावर उत्कृष्ट संस्कृती कार्यक्रम व कवळ्या सादर करून इंडियन आर्मी नाव केल्याबद्दल सादर केल्या बद्दल अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या देशासाठी कार्य करावे असे मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक प्राचार्य मडके बी के तर आभार मुख्याध्यापिका भोर आर आर मॅडम यांनी मांडले

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page