संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दि ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा
बैठकीत मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने करण्यात आले आवाहन
जामखेड प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जामखेड येथील तहसील कार्यालया समोर दि ६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची महासभा होणार आहे. या कार्यक्रमाची दुसरी नियोजन बैठक साई गार्डन नगर रोड जामखेड या ठीकाणी आज दि ४ आॅक्टोबर रोजी सकाळी संपन्न झाली. तरी या कार्यक्रमास तालुक्यातील जास्तीत जास्त मराठा बांधवांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे.
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे दि ६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खर्डा मार्गे जामखेडकडे येणार आहेत. त्यामुळे खर्डा येथिल मराठा बांधवांच्या वतीने त्यांचे खर्डा बस स्थानक परिसरात सहा जेसीबींच्या माध्यमातून फुलांची उधळण करत व मोठा हार घालून सत्कार करण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी स्वागत झाल्यावर ते जामखेडकडे रवाना होणार आहेत. मात्र सभेपूर्वी जरांगे पाटील हे चौंडी येथे जाऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिस्तंभाचे दर्शन घेऊन पुन्हा जामखेडके सभास्थळी येणार आहेत.
आयोजित करण्यात आलेल्या बैठकी मध्ये प्रत्येक मराठा बांधवांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आसल्याने येणाऱ्या वाहनांच्या पार्किंग बाबत चर्चा झाली. खर्डा, नान्नज व जवळा भागातून येणाऱ्या बांधवांसाठी लक्ष्मी चौक येथुन नवीन नगरपरिषद रोडने मोरे वस्ती समोरील प्लॉटींग मध्ये वहाने पार्किंग करावीत, बीड रोडने येणारी वाहने कृषी उत्पन्न बाजार समिती व मराठी शाळेच्या पाठीमागील आवारात तर नगररोड ने येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था पन्हाळकर हॉस्पिटल मार्गे जुन्या गोडाऊनच्या ग्राऊंड मध्ये करण्यात आली आहे.
दुपारी ३ वाजता मनोज जरांगे पाटील यांचे शहरात आगमन होताच ठीक ठीकाणी जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आसुन प्रत्येक चौकात त्यांचे स्वागत होणार आहे. सभास्थळी आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना होईल. तालुक्यातील लहान मुलींच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होईल येणाऱ्या सर्व मराठा बांधवांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय शहरातील डॉ पन्हाळकर यांच्या तर्फे करण्यात आली आहे. या कार्यक्रमास आपल्या मतदारसंघांतील दोन्ही आमदार व खासदार आमंत्रित करण्यात आले आसले तरी एकही राजकीय भाषण त्या ठिकाणी होणार नाही अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.
दि ६ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांच्या होणाऱ्या सभेस तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे. प्रत्येक मराठा बांधवांनी महासभेसाठी येताना व जाताना सुरक्षित व सावकाश वाहने चालवत यावे आपल्या वाहनामुळे कोणालाही धोका होणार नाही याची काळजी सर्व समाज बांधवांनी घ्यावी अशी विनंती देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.