जामखेड बाजार समिती येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
डॉ.बाबासाहेबांच्या जीवनमूल्यांचा जागर करणे ; हेच अभिवादन
– सभापती पै.शरद कार्ले
जामखेड प्रतिनिधी,
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी जामखेड
पंचायत समिती, बाजार समिती येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
काळ बदलला आहे. या काळाने आधुनिक जीवनमूल्ये प्रस्थापित करणारी मूल्ये आणि शक्ती दिली आहे. माझ्या मते केवळ बाबासाहेबांच्या फोटो समोर माथा टेकवणे म्हणजे अभिवादन नव्हे, तर बाबासाहेबांच्या एकूणच वैचारिक अधिष्ठानाचा, त्यांना अभिप्रेत असलेला जीवनमूल्यांचा जागर करणे होय.
ही घटनात्मक जीवनमूल्ये अबाधित ठेवायची असतील, तर या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी आपण निश्चय केला पाहिजे, की ही जीवनमूल्ये जपणारी व्यवस्था निर्माण करू.सद्यस्थिती एकूणच त्यांच्या जीवनातील वैचारिक सूत्राशी आणि भावविश्वाशी संबंधित अशीच आहे.सत्तेशिवाय व्यवस्था बदलली जात नाही. डॉ.बाबासाहेबांनी म्हटले आहे, ‘सत्ता हे समाजपरिवर्तनाची गुरुकिल्ली आहे.’असे मत सभापती पै.कार्ले यांनी व्यक्त केले.
यावेळी सभापती पै.शरद कार्ले, संचालक सुरेश पवार ,संचालक रविंद्र हुलगुंडे, सचिव वाहेद सय्यद,दिपक सदाफुले, अशोक यादव आदी कर्मचारी उपस्थित होते.