कालिका पोदार लर्न स्कूल हे फक्त शिक्षणावरच भर न देता खेळ कला व संस्कृती जपण्याचे काम देखील करत आहे- गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

*कालिका पोदार लर्न स्कूल हे फक्त शिक्षणावरच भर न देता खेळ कला व संस्कृती जपण्याचे काम देखील करत आहे- गटविकास अधिकारी प्रकाश पोळ*

जामखेड प्रतिनिधी

जामखेड च्या शैक्षणिक क्षेत्रात जेंव्हा जेंव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा कालिका पोदार लर्न स्कूल जामखेडचे नाव आभिमानाने घेतले जाईल. कारण कालिका पोदार लर्न स्कूल हे औपचारिक शिक्षणावर आवलंबुन न रहाता खेळ कला व संस्कृती जपण्याचे काम करत आहे. आसे मत जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.

कालिका पोदार लर्न स्कूल (CBSE) जामखेड मध्ये दुसरा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी प्रकाश पोळ तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, बबन (काका) काशिद, कृषी अधिकारी अशोक शेळके, कैलास खैरे, यांच्या सह महादेव डुचे, रविंद्र कडलग, याबरोबर कालिका पोदार लर्न स्कूल (CBSE) चे संस्थापक उमाकांत अंदुरे, नितिन तवटे, प्रशांत कानडे, निलेश तवटे, सागर अंदुरे, प्राचार्य प्रशांत जोशी सह पालक शिक्षक संघाचे सदस्य, पत्रकार, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

पुढे बोलताना प्रकाश पोळ म्हणाले की, कालिका पोद्दार स्कूलच्या या रोपट्याचा भविष्यात वटवृक्ष निर्माण होईल, येथे विद्यार्थ्यांची सर्वागीण तयारी करून घेतली जात आहे. स्पर्धा परिक्षाबाबत मार्गदर्शन व तयारी करून घेतली जात आहे यामुळे भविष्यात अनेक विद्यार्थी उच्च अधिकारी होतील. या शाळेत खरोखरच विविधांगी उपक्रमातून विद्यार्थ्यांना संस्कार सोबतच शारिरीक व बौद्धिक विकास या गुणांना वाव दिला जात आहे. यानंतर कार्यक्रमासाठी त्यांनी शाळेचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस कालिका पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खंडागळे (नाना) यांच्या मार्गदर्शनाखाली चित्त थरारक रोप वे व मल्लखांब प्रात्यक्षिके करून सर्वाची मने जिंकली. यानंतर स्केटिंग व लाठीकाठी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. नंतर एलकेजी, युकेजी, पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपली बहारदार गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली माननीय प्राचार्य श्री प्रशांत जोशी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य प्रशांत जोशी यांनी केले त्यात त्यांनी यावर्षी घेतलेल्या विविध कार्यक्रमाचे व विद्यार्थी उपयोगी प्रयोजनांचे वाचन केले व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था नेहमी बांधिल असेल असे त्यांनी प्रमाणित केले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page