प्रा.सचिन गायवळ अजित पवार गटाचा नवीन चेहरा.?

 

सचिन गायवळ अजित पवार गटाचा नवीन चेहरा.?

जामखेड प्रतिनिधी,

निवडणूक आयोगाने नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला आहे याबाबत आ रोहित पवार यांचा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते व कै गोपीनाथ मुंडे यांना मानणारे मंत्री धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते सचिन गायवळ यांची थेट जामखेड शहरात ना अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावुन एकच खळबळ उडवून दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार गटाचा जामखेड तालुक्यातील चेहरा कोण असेल यांची उत्सुकता होती मात्र सचिन गायवळ यांनी बॅनर लावुन उघडपणे अजित पवार गटाला शुभेच्छा दिल्याने आ रोहित पवार यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

प्रा सचिन गायवळ यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. आ रोहित पवार यांना विधानसभा निवडणुकीत तसेच जामखेड पंचायत समिती यासह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात मिळवुन देण्यासाठी त्याचा सिंहाचा वाटा होता. मात्र निवडुन आल्यानंतर आ रोहित पवार यांच्या काही निकटवर्तीयानी गायवळ यांच्या बद्दल चुकीचे माहिती आ पवार यांना दिल्याने चुकीच्या माहितीच्या आधारे प्रा सचिन गायवळ यांना पक्ष संघटनेपासून दुर ठेवण्यात आले होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून गायवळ राष्ट्रवादी काँग्रेसपासून अलिप्त राहू लागल्याने ते भाजपात प्रवेश करतील असे अनेकांना वाटत होते सचिन गायवळ यांनी आपले राजकीय वजन दाखविण्यासाठी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे आ राम शिंदे यांच्या पॅनलला पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने पराभव करून भाजपाला मदत केली.

 

सचिन गायवळ यांनी उघडपणे अजित पवार यांचे अभिनंदनाचे बॅनर शहरात लावले आहे यावरून एक स्पष्ट होत आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा जामखेड तालुक्यातील चेहरा म्हणून सचिन गायवळ असु शकणार आहे. गायवळ यांचे गावागावात असणारे अनेक नेते कार्यकर्तेही अजित पवार गटात येण्याची शक्यता आहे तसे झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार हे गायवळ यांना बळ देऊ शकतात यांची शक्यता आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page