आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत अंगदराव गरड यांचा अभिष्टचिंतन सेवा निवृत्तसोहळा होणार संपन्न
अठ्ठावीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात विविध पुरस्कार झाले प्राप्त,शौक्षणिक क्षेत्रात केले उल्लेखनीय कार्य.
जामखेड प्रतिनिधी,
मा .श्री अंगदराव गणपतराव गरड पाटील सर यांचे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त कार्यक्रम आणि शिक्षण क्षेत्रामधील उल्लेखनीय कार्याचा सन्मान गौरव सत्कार कार्यक्रम दिनांक १७ / २ / २० २४ शनिवार सायं ‘ सहा वाजता श्री क्षेत्र हनुमान मंदिराजवळ निंबोडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे संपन्न होणार आहे.
श्री अंगदराव गणपतराव गरड पाटील सर यांनी सहशिक्षक क्रांतिवीर चाफेकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चिंचवडगाव पुणे येथे अठ्ठावीस वर्ष शौक्षणिक सेवा केली.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षक महासंघ महाराष्ट्र पुणे विभाग संघटक सल्लागार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव म्हणून गेले पंधरा वर्षे खंबीरपणे त्यांनी आपली जबाबदारी संभाळली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे दिला जाणार गुणवंत शिक्षक पुरस्काराने गरड सर यांना सन्मानित करण्यात आले आहे तसेच
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कारासह
रोटरी क्लब लायन्स क्लब पुणे जिल्हा परिषद यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
जिल्हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले तर जिल्हास्तर विभाग स्थर राज्यस्तर राष्ट्रीय स्तर यामध्ये कबड्डी कुस्ती योगासन बुद्धिबळ अथलेटिक्स सॉफ्टबॉल बेसबॉल इत्यादी खेळांमध्ये अनेक खेळाड त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत.
क्रीडा शिक्षकांच्या संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या हक्क व मागण्यांसाठी नेहमीच आग्रेसर भुमिका मांडली.
इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा एक्झामिनर मॉडरेटर म्हणून अनेक वर्ष काम पाहिले शिक्षकांसाठी मार्गदर्शक प्रशिक्षण शिबिरांद्वारे मार्गदर्शक म्हणून काम केले
एन सी सी एम सी सी आर एस पी शिक्षक प्रशिक्षक जिल्हा समादेशक म्हणून काम केले
शासकीय नियमानुसार वयाच्या अटीनुसार अंगद गरड हे येत्या सतरा फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
याबाबत बोलताना अंगद गरड म्हणले की मी गेले 28 वर्षे केलेल्या कामात द्वारे खूप आनंदी आणि समाधानी आहे याचा मला अभिमान वाटतो पुढील काळात गावच्या विकासासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी काम करणार आहे.
तसेच शौक्षणिक क्षेत्र हे माझ्या आवडीचे आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे गावखेड्यातील मुलांनी शेतीबरोबरच शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचा अधार बनले पाहिजे यासाठी मी सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन करणार आहे आसे सांगितले.