आरोग्य निरोगी राखणे ही खरी संपत्ती – राजेश चव्हाण राष्ट्रीय लिडर
– – – – – – – – – – – – – – – – – – – – –
जामखेड – सध्याच्या धाकधुकीच्या जीवनात मनुष्य संपत्ती कमावण्याच्या नादात आरोग्याकडे दूर्लक्ष करत आहे. त्यामुळे रक्तप्रवाहाचे प्रमाण बिघडले, आँक्सीजन कमी होणे परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
बायोटोरीयम कंपनीने मॅग्नेटचे थेरफीचे सहजासहजी वापरात येणारी प्रॉडक्ट बाजारात आणून निरोगी जीवन जगण्याचा मंत्र देत आहे. निरोगी आरोग्य राखणे ही खरी आपली संपत्ती आहे असे प्रतिपादन ई बायोटोरीयम कंपनीचे राष्ट्रीय लिडर राजेश चव्हाण यांनी गुरुवारी मॅग्नेट थेरफी प्रॉडक्ट उद्घाटन कार्यक्रमात केले.
जामखेड येथे दत्त कॉलनीत पत्रकार अशोक निमोणकर यांच्या ई बायोटोरीयम कंपनीचे मॅग्नेट थेरफी प्रॉडक्ट दालनाचे उद्घाटन राष्ट्रीय लिडर राजेश चव्हाण यांच्या हस्ते झाले त्यावेळी अयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, भाजप शहराध्यक्ष पवनराजे राळेभात नगरसेवक मोहन पवार, बिभीषण धनवडे, पोपट राळेभात, संजय येरम, विजय निम्हण, प्रवीण चोरडिया, दशरथ हजारे, विष्णू हजारे, उदयसिंह पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेश चव्हाण म्हणाले, आपले शरीर हवा, पाणी, अन्न सुर्यकिरण व चुंबकीय शक्ती या पंचतत्वाने तयार झाले आहे. हे पंचतत्व व्यवस्थित असेल तर मनुष्य आजारी पडत नाही. कोवीड काळात आँक्सीजन, रक्तपुरवठा होत नव्हता त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. मॅग्नेट हे काय खाण्यापिण्याचे वस्तू नाही ते पृथ्वीच्या पोटात हजार फुट खोल गेल्यावर पावडर रूपात मिळते व जगात ते फक्त जपान, कोरीया, चीन व अमेरीका येथेच मिळते. बायोटोरीयम कंपनी तेथून ते आयात करून भारतात वस्तू बनवत आहे.
या वस्तु शरीराला सहज हाताळता येत असून यामुळे
आँक्सीजन वाढ, सुरळीत रक्तप्रवाह व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. कोवीड काळात मॅग्नेट थेरफी प्रॉडक्ट थेट ग्राहकांना देणारी पहीली भारतीय कंपनी ठरली आहे.
प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, आजही आपला समाज आरोग्या बाबत जागृत नाही. आजारी पडला तरच आपण डॉक्टरकडे जातो पण त्याबाबत काळजी घेतली जात नाही. बायोटोरीयम कंपनीने मॅग्नेट थेरफीचे अनेक प्रॉडक्ट बाजारात थेट ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे. ब्लड सर्क्युलेशन, आँक्सीजनची कमतरता असल्याने आजाराला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे बायोटोरीयम कंपनीने विविध प्रॉडक्ट ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे.
आपल्याला आरोग्य संपन्न जगायचे असेल तर आता या मॅग्नेट थेरफी प्रॉडक्ट वापरणे आवश्यक आहे.
यावेळी रत्नदीप मेडिकल फौंडेशन अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिम लिडर संजय येरम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कैलास हजारे व आभार नासीर पठाण यांनी मानले.